Home /News /mumbai /

'गांभीर्याने घेण्याची गरज नाही' म्हणत 30 मिनिटांच्या परिषदेत 22 मिनिटं राज ठाकरेंवर बोलले शरद पवार, अल्टिमेटमबाबत म्हणाले...

'गांभीर्याने घेण्याची गरज नाही' म्हणत 30 मिनिटांच्या परिषदेत 22 मिनिटं राज ठाकरेंवर बोलले शरद पवार, अल्टिमेटमबाबत म्हणाले...

विशेष बाब म्हणजे स्वतः शरद पवारच आपल्या 30 मिनिटांच्या पत्रकार परिषदेत २२ मिनिटं राज ठाकरेंविषयीच बोलत राहिले. राज ठाकरे यांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढताना पवार यांनी राज यांच्या प्रश्नांचे खुलासे दिले.

    मुंबई 14 एप्रिल : गुढीपाडव्याच्या मुंबईतील सभेनंतर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी मनसेने ठाण्यात उत्तरसभा (MNS Uttar Sabha in Thane) आयोजित केली. ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आपल्या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनीही राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, की मनसे अध्यक्ष राज ठाकरे चार-सहा महिन्यांत अचानक उगवतात. त्यांच्या सभांना गर्दी होते, मात्र त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मात्र विशेष बाब म्हणजे स्वतः शरद पवारच आपल्या 30 मिनिटांच्या पत्रकार परिषदेत २२ मिनिटं राज ठाकरेंविषयीच बोलत राहिले. राज ठाकरे यांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढताना पवार यांनी राज यांच्या प्रश्नांचे खुलासे दिले. 22 मिनिटं पवारांनी राज ठाकरे यांच्याविषयीच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले पवार यांच्याविषयीचे प्रश्न त्यांना चांगलेच झोंबल्याचं स्पष्ट झालं आहे. याशिवाय 3 मेनंतर मशिदींवरचे भोंगे उतरवण्याचा राज ठाकरे यांनी दिलेला अल्टिमेटम गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचा सल्लाही शरद पवारांनी राज्य सरकारला दिला. राज ठाकरेंबद्दल 22 मिनिटं बोलल्यानंतर, एखादी व्यक्ती वर्ष-सहा महिन्यांत एखादे वक्तव्य करत असेल तर ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पण पत्रकार विचारताहेत, म्हणून मत व्यक्त करतोय, असं पवार यांनी म्हटलं 'काल मुस्लीम वेशभूषा, आज हनुमान अन् उद्या...?' शिवसेना भवनासमोर राज ठाकरेंविरोधात पोस्टरबाजी अजित पवारांबाबतच्या प्रश्नावर दिलं उत्तर - अजित पवारांच्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, अजित पवार यांच्यावर ईडीची कारवाई होते आणि सुप्रिया सुळे यांच्यावर होत नाही, हा राज यांचा आरोप अगदी पोरकट आहे. अजित पवार आणि मी वेगळा नाही. आमचं कुटुंब एकच आहे. पुढे राज ठाकरेंच्या विधानाला प्रत्युत्तर देत पवार म्हणाले, की सोनिया गांधी यांनी “मी पंतप्रधानपदावर जाऊ इच्छित नाही,’ असे जाहीर वक्तव्य केल्यानंतर तो प्रश्न तिथेच संपला होता. आमची चर्चा त्यांच्या पंतप्रधानपदाबाबत होती, तो विषय निकाली लागल्यानंतर त्यावर चर्चा करण्याचं कारण नव्हतं. त्यामुळे काँग्रेससोबत आम्ही तेव्हा गेलो आणि आजही त्यांच्यासोबत आहोत. आमचा संपणारा पक्ष नसून संपवणारा पक्ष आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते. यावरही पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की संपवणारा पक्ष याची नोंद महाराष्ट्रातील मतदारांनी योग्य घेतली. त्यांचा एकच आमदार निवडून आलेला आहे. त्यांच्या सभा मोठ्या होतात, सभेला लोक जातात. त्या सभेत शिवराळ भाषा आणि नकलांतून लोकांची करमणूक होते. Raj Thackeray: ठाण्यातील उत्तरसभेत तलवार दाखवणं अंगलट; राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल राज यांच्या भाषणात भाजपबद्दल एकही शब्द आलेला नाही, याबद्दलही शरद पवार बोलले. ते म्हणाले की त्यांच्यावर भाजपने कदाचित काही जबाबदारी दिलेली असावी, त्याचा प्रत्यय या सभेत आला. महागाई, बेरोजगारी एवढी वाढलेली असताना जर एखादा राजकीय नेता आपल्या सभेत एक शब्द बोलत नसेल तर काय समजायचं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पवार नाव घेत नाहीत, या राज यांच्या आरोपावरही पवारांनी उत्तर दिलं. पवार म्हणाले की दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीत होतो. त्या ठिकाणचं माझं संपूर्ण भाषण ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर जवळपास मी 25 मिनिटं बोललो. अर्थात मला रोज सकाळी लवकर उठून वृत्तपत्र वाचनाची सवय आहे. त्यासाठी मला लवकर उठावं लागतं, असा चिमटाही त्यांनी राज यांना काढला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Raj Thackeray, Sharad Pawar (Politician), Thane

    पुढील बातम्या