जाहिरात
मराठी बातम्या / देश / Santosh suicide case: अखेर कर्नाटक सरकारमधील मंत्री केएस ईश्वरप्पा राजीनामा देणार, वाचा संपूर्ण प्रकरण

Santosh suicide case: अखेर कर्नाटक सरकारमधील मंत्री केएस ईश्वरप्पा राजीनामा देणार, वाचा संपूर्ण प्रकरण

Santosh suicide case: अखेर कर्नाटक सरकारमधील मंत्री केएस ईश्वरप्पा राजीनामा देणार, वाचा संपूर्ण प्रकरण

Santosh suicide case: कंत्राटदार संतोष पाटील यांचा मृतदेह सोमवारी उडुपी जिल्ह्यात मृतावस्थेत आढळला होता. त्यांच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी त्यांनी त्यांच्या एका सहकाऱ्याला मेसेज केला होता, ज्यामध्ये संतोष पाटील यांनी त्यांच्या मृत्यूसाठी मंत्री के एस ईश्वरप्पा यांना जबाबदार धरले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 एप्रिल : कर्नाटक सरकारमधील मंत्री केएस ईश्वरप्पा (ks eshwarappa) उद्या म्हणजेच शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. कंत्राटदार संतोष पाटील (Santosh Patil Suicide Case) यांच्या कथित आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले मंत्री ईश्वरप्पा यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सादर करणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) म्हणाले की, वादग्रस्त मंत्री ईश्वरप्पा सध्यातरी सरकारमध्येच राहतील. कंत्राटदार संतोष पाटील यांचा मृतदेह सोमवारी उडुपी जिल्ह्यात आढळला होता. त्यांच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी त्यांनी त्यांच्या एका सहकाऱ्याला मेसेज केला होता, ज्यामध्ये संतोष पाटील यांनी त्यांच्या मृत्यूसाठी मंत्री के एस ईश्वरप्पा यांना जबाबदार धरले होते. वादात अडकल्यानंतर आता मंत्री ईश्वरप्पा म्हणाले की ते शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सादर करतील आणि सहकार्यासाठी सर्व सहकार्यांचे आभार मानतील. एका 20 वर्षीय बेरोजगार तरुणाने राज्यापासून केंद्रापर्यंत कसा दिला हादरा! हार्दिक यांची नेता बनण्याची कहाणी मंत्री ईश्वरप्पा यांनी पत्रकार परिषदेत राजीनामा जाहीर केला. मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्ट्रॅक्टर संतोष पाटील यांनीही मृत्यूच्या काही दिवस आधी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले होते आणि त्यात त्यांनी आरोप केला होता की, मंत्री ईश्वरप्पा या कामासाठी त्यांच्याकडून 40 टक्के कमिशन मागत आहेत. संतोष पाटील यांचे हे आरोप मंत्र्यांनी साफ फेटाळून लावले. केएस ईश्वरप्पा यांची गणना कर्नाटकातील दिग्गज नेत्यांमध्ये केली जाते आणि सध्या ते कर्नाटक सरकारमध्ये ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री आहेत. ईश्‍वर स्वतः भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे जात आहेत, तर त्यांनी गेल्या वर्षी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: karnataka
  • First Published :
जाहिरात
जाहिरात