मराठी बातम्या /बातम्या /देश /

अनेक राज्यात रामनवमीवरुन राडा! जेएनयूत हाणामारी, एसटी कर्मचाऱ्यांचं काय होणार? वाचा देशविदेशातील घडामोडी एका क्लिक वर

अनेक राज्यात रामनवमीवरुन राडा! जेएनयूत हाणामारी, एसटी कर्मचाऱ्यांचं काय होणार? वाचा देशविदेशातील घडामोडी एका क्लिक वर

रविवारी रामनवमी निमित्त निघालेल्या अनेक मिरवणुकीत दगडफेक आणि राडा झाल्याच्या घटना घडल्या. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातही या गोष्टीवरुन वाद झाला. दरम्यान, फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांबद्दल आज मोठा निर्णय घेण्यात येणार आहे.

रविवारी रामनवमी निमित्त निघालेल्या अनेक मिरवणुकीत दगडफेक आणि राडा झाल्याच्या घटना घडल्या. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातही या गोष्टीवरुन वाद झाला. दरम्यान, फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांबद्दल आज मोठा निर्णय घेण्यात येणार आहे.

रविवारी रामनवमी निमित्त निघालेल्या अनेक मिरवणुकीत दगडफेक आणि राडा झाल्याच्या घटना घडल्या. दिल्लीतील जेएनयू विद्यापीठातही या गोष्टीवरुन वाद झाला. दरम्यान, फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांबद्दल आज मोठा निर्णय घेण्यात येणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 12 एप्रिल : एसटी महामंडळातील फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या कर्मचाऱ्यांविषयी आज मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्याच्या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी संपत आहे. तर सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होतेय. तिकडे पाकिस्तानच्या होणाऱ्या पंतप्रधानांनी काश्मीरवरुन भारताला डिवचलंय. रशिया-युक्रेन युद्धानंतर पहिल्यांदाच बायडेन यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांची आभासी बैठक होतेय. तर तिकडे चीनने रशियाचा मित्र सर्बिया मिसाईल पाठवल्याची चर्चा आहे. देशविदेशातील अशा अनेक घडामोडी जाणून घ्या अगदी काही मिनिटांत.

राज्यातील महत्वाच्या घडामोडी

एसटी महामंडळाची तातडीची बैठक होणार असून फौजदारी गुन्हे दाखल कर्मचाऱ्यांचं काय करायचं? यावर चर्चा.

राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना झालेली पोलीस कोठडी आज संपणार आहे. यावर किल्ला कोर्टात सुनवणी होईल.

भाजप आमदार आशिष शेलार मुंबईतील नाले सफाईची पाहणी करणार असून यासाठी ते मालाड येथून सुरवात करणार आहे.

किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी

किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार असून, अनेक मोठी नावे आणि माहिती गोळा करायची असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले होते. अशा स्थितीत पोलिसांचा न्यायालयात युक्तिवाद आवश्यक असणार आहे.

प्रवीण दरेकर हाजीर हो..

मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. दरेकर यांना आज सकाळी 11 वाजता एमआरए पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.

रामनवमीच्या दिवशी अनेक राज्यांमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि गोंधळ

रामनवमी निमित्त विहिंपची मिरवणूक कोलकात्याला लागून असलेल्या हावडा येथील फजीर बाजार परिसरातून जात असताना, स्थानिक लोकांनी मिरवणुकीवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. दगडफेकीनंतर मिरवणुकीत सहभागी अनेक लोक जखमी झाले.

बांकुरा- पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात रामनवमीच्या मिरवणुकीनंतर परिसरात तणाव पसरला आहे. मिरवणूक परवानगी मार्गावरून वळवल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ही घटना बांकुरा येथील मचंतला परिसरात घडली. पोलिसांनी कथितरित्या बॅरिकेड्स वापरून मिरवणुकीचा मार्ग रोखला, ज्यामुळे गोंधळ उडाला.

खरगोन येथे एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान दोन गटात झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या गोंधळानंतर चार भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून संपूर्ण शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

गुजरातमधील खंभात येथे रामनवमीनिमित्त यात्रेवर दगडफेक, यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याची माहिती.

साबरकांठातील हिम्मतनगरमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत दगडफेक.

रामनवमीच्या दिवशी मांसाहार करण्यावरुन जेएनयू कॅम्पसमध्ये राडा

रामनवमीच्या दिवशी जेएनयू कॅम्पसमध्ये डाव्या आणि अभाविपच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी अभाविपने त्यांना मांसाहार करण्यापासून रोखल्याचा आरोप केला, तर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी त्यांना वसतिगृहात पूजा करण्यापासून रोखल्याचा आरोप डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर केला आहे. यात दोन्ही बाजूचे सहाजण जखमी झाल्याचे माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

अलर्ट

अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे.

पाकिस्तानत नवा गडी नवं राज्य..

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये आज दुपारी 2.30 वाजता नवीन पंतप्रधान निवडण्यासाठी मतदान होणार आहे. विरोधी पक्षाकडून शाहबाज शरीफ आणि पीटीआयकडून शाह मेहमूद कुरेशी हे उमेदवार आहेत. इम्रान खान यांची अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रविवारी पहाटे तहकूब करण्यात आलेली नॅशनल असेंब्लीची पुन्हा एकदा बैठक झाली. संयुक्त विरोधी पक्षाने खान यांच्या जागी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे अध्यक्ष शेहबाज शरीफ यांचे नाव आधीच दिले आहे. त्यामुळे आता शेहबाज शरीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. दरम्यान, आता माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढणार आहेत. खान यांचं नाव ईसीएलमध्ये टाकण्याच्या याचिकेवर इस्लामाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे

नवीन सरकारचे भारतासोबत संबंध कसे असतील?

शेहबाज शरीफ म्हणाले, की राष्ट्रीय समरसता ही माझी पहिली प्राथमिकता आहे. आम्ही एक नवीन युग सुरू करू आणि परस्पर आदर वाढवू. आम्हाला भारतासोबत शांतता हवी आहे. पण, काश्मीर प्रश्न सोडवल्याशिवाय शांतता शक्य नाही.

पंतप्रधान मोदी यांची बायडेन यांच्यासोबत बैठक

युक्रेन संकटानंतर पंतप्रधान मोदी यांची आज (11 एप्रिल) यूएसएचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासोबत आभासी बैठक होईल. दोन्ही नेते सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतील आणि दक्षिण आशियातील अलीकडील घडामोडी, इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील.

तर दुसरीकडे अमेरिकेत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, यूएस-भारत चर्चेत भाग घेतील. या वर्षीचा कार्यक्रम राजनैतिक संबंधांची 75 वर्षे साजरी करणारा असेल. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी यूएस-भारत व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारीच्या महत्त्वाची पुष्टी करतील.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांचं दिल्लीत आंदोलन

केंद्रासोबत भातखरेदीच्या वादात मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा राष्ट्र समिती केंद्राच्या राज्यातून तांदूळ खरेदी न करण्याच्या निर्णयाविरोधात राजधानी दिल्लीत मोठं आंदोलन करणार आहे. टीआरएस एक राष्ट्र, एक खरेदी नियमाची मागणी करत असताना केंद्राने टीआरएसवर शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करत त्यांना फटकारले आहे. कमी मागणीमुळे या रब्बी हंगामात एफसीआय यापुढे राज्यातून parboiled तांदूळ खरेदी करणार नाही याची टीआरएसला आधीच माहिती देण्यात आल्याचे केंद्राचे म्हणणे आहे.

आंध्र प्रदेश सरकार 2.0

पहिल्या मंत्रिमंडळातील 10 ज्येष्ठ मंत्री कायम राहणार, सुत्रांची माहिती. तर SC, ST, BC आणि अल्पसंख्याक समुदायातील 17 नेते जगन यांच्या नवीन मंत्रिमंडळाचा भाग असतील. पहिल्या मंत्रिमंडळात या समुदायातील 14 नेते होते.

बातमी युद्धभूमीवरुन..

युक्रेन-रशिया युद्धादरम्यान चीनचा मोठा निर्णय, रशियाचा मित्र सर्बियाला गुपचूप पाठवली क्षेपणास्त्रं?

ग्लोबल टाइम्सने सर्बियामध्ये 6 चिनी मालवाहू विमाने पाहिल्याची पुष्टी केली, या लेखात म्हटले आहे की चीनमध्ये बनवलेले हे देशांतर्गत विमान आतापर्यंतचे सर्वात मोठे ऑपरेशन होते. दरम्यान, या मालवाहू विमानात काय लोड करण्यात आलं होतं, याची माहिती मिळाली नाही.

युक्रेनमध्ये पुन्हा मृतदेहांचा खच

युक्रेनच्या सरकारी वकील इरीना वेनेडिक्टोव्हा यांनी रविवारी सांगितले की राजधानी कीवच्या आसपासच्या प्रदेशात आतापर्यंत 1,222 मृतदेह आढळले आहेत.

दरम्यान, पुतिन, लुकाशेन्को 12 एप्रिल रोजी रशियन सुदूर पूर्व येथे भेटणार आहेत. दोन्ही हुकूमशहा रशियन सुदूर पूर्वेतील व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथे युक्रेनमधील युद्धावर चर्चा करतील.

दोन्ही देशात कैद्यांची देवाणघेवाण

रशियन मानवाधिकार आयुक्त तातियाना मोस्काल्कोव्हा यांनी रविवारी पुष्टी केली की रशिया आणि युक्रेनने शनिवारी कैद्यांची देवाणघेवाण केली.

श्रीलंका आर्थिक संकट:

श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी आर्थिक संकटावर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र खासदारांना आमंत्रित केले. श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी 42 अपक्ष खासदारांचा समावेश असलेल्या अकरा-पक्षीय युतीच्या मित्रपक्षांना देशातील सर्वात वाईट आर्थिक संकटावर चर्चेसाठी आमंत्रित केले आहे, असे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. रविवारी संध्याकाळी होणार्‍या बैठकीदरम्यान, खासदार राष्ट्रपतींना त्यांचे मोठे भाऊ, पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना हटवण्याची आणि बेट राष्ट्राला भेडसावणाऱ्या अभूतपूर्व संकटाला तोंड देण्यासाठी नवीन मंत्रिमंडळ नियुक्त करण्याची विनंती करतील. दरम्यान, अध्यक्षांच्या घराबाहेल लोकांची निदर्शन सुरुच.

First published:

Tags: JNU, Pakistan, Pm modi, Russia Ukraine, St bus, USA