मराठी बातम्या /बातम्या /देश /Non-veg खाण्यावरुन गोंधळ, JNU मध्ये दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी

Non-veg खाण्यावरुन गोंधळ, JNU मध्ये दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी

जवाहर लाल नेहरू विश्वविद्यालयाच्या (जेएनयू) कॅम्पसमध्ये मासांहार अन्नावरुन (नॉन वेज) दोन विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाला.

नवी दिल्ली, 10 एप्रिल : जवाहर लाल नेहरू विश्वविद्यालयाच्या (JNU) कॅम्पसमध्ये मासांहार अन्नावरुन (नॉन वेज) दोन विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री घडली. नवरात्रीचा उपवास ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या मेसमध्ये मांसाहार अन्न ठेवण्यावरुन आक्षेप व्यक्त केला होता.

यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी यावर विरोध केल्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला. या दरम्यान दोन्ही संघटनांने विद्यार्थी जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. तर जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान दुसरीकडे ABVP कार्यकर्त्यांवर आरोप आहे की, त्यांनी नॉन व्हेज अन्न खाण्यास रोखलं.

तर ABVP च्या कार्यकर्त्यांनी डाव्या संघटनेवर आरोप केला आहे की, त्यांनी राम नवमीच्या दिवशी हॉस्टेलमध्ये पूज करण्यास रोखलं.

First published:

Tags: Delhi, JNU