Home /News /national /

पाकिस्तानात इम्रान खान Out..शरीफ कुटुंबाचं ComeBack, भारतावर कसा होणार परिणाम?

पाकिस्तानात इम्रान खान Out..शरीफ कुटुंबाचं ComeBack, भारतावर कसा होणार परिणाम?

पाकिस्तानातील (Pakistan) सत्तेच्या राजकारणात इम्रान खान (Imran Khan) यांची विकेट पडली आहे. नॅशनल असेंब्लीनं (National Assembly) ऐतिहासिक अविश्वास प्रस्तावाद्वारे इम्रान यांना पंतप्रधानपदावरून (Prime Minister) हटवलं आहे.

    नवी दिल्ली, 10 एप्रिल: पाकिस्तानातील (Pakistan) सत्तेच्या राजकारणात इम्रान खान (Imran Khan) यांची विकेट पडली आहे. नॅशनल असेंब्लीनं (National Assembly) ऐतिहासिक अविश्वास प्रस्तावाद्वारे इम्रान यांना पंतप्रधानपदावरून (Prime Minister) हटवलं आहे. आता पाकिस्तानात शाहबाज (Shahbaz) शरीफ पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसण्याची शक्यता आहे. शाहबाज हे पाकिस्तानचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले नवाझ शरीफ (Prime Minister Nawaz Sharif) यांचे धाकटे बंधू आहेत. पाकिस्तानच्या राजकारणात भारताचे नेहमीच महत्त्वाचे स्थान राहिलं आहे. इम्रान खान यांचे पाकिस्तानच्या सत्तेतून बाहेर पडणं आणि शरीफ कुटुंबाच्या संभाव्य पुनरागमनाचा भारतासाठी काय फायदा आहे. जाणून घेऊया. पाकिस्तानच्या राज्यघटनेला 10 एप्रिल 1973 रोजी संसदेने मंजुरी दिली. आता तब्बल 49 वर्षांनंतर 10 एप्रिल रोजी नॅशनल असेंब्लीने 174 मतांनी पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानांना खुर्चीवरून हटवलं आहे. दोन मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन इम्रान खानचा पंतप्रधानपदाच्या खुर्चीपर्यंतचा उदयही नेत्रदीपक होता. इम्रानच्या आगमनापूर्वी, जेव्हा-जेव्हा पाकिस्तानमध्ये लष्कराव्यतिरिक्त कोणीतरी सत्तेवर बसले तेव्हा ते पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) किंवा पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते होते. 1947 मध्ये भारतापासून वेगळे झाल्यानंतर पाकिस्तान अस्तित्वात आला, आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये तीन युद्धे झाली आहेत. यापैकी दोनदा हे दोघेही काश्मीरबाबत रणांगणावर उतरले. पाकिस्तानचे काश्मीरबाबतचे वेड कोणापासून लपलेले नाही. इम्रान खान यांनीही त्यांच्या कार्यकाळात संयुक्त राष्ट्रांसह अनेक व्यासपीठांवर काश्मीरचा मुद्दा मांडला, पण प्रत्येक वेळी ते अपयशी ठरले. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि पुढेही राहील, असे भारत सुरुवातीपासून म्हणत आला आहे. Imran Khanचं सरकार कोसळताच, पाकिस्तानच्या महिला पत्रकाराला आठवले अटलजी, शेअर केला Video 2018 मध्ये इम्रान खान पाकिस्तानात सत्तेवर आल्यानंतर त्यांचे भारतासोबतचे संबंध आणखीच बिघडले. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 CRPF जवान पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मारले होते. यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळांवर लष्करी कारवाई केली. या कारवाईने केवळ पाकिस्तानच नाही तर संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले. दुसर्‍या दिवशी, पाकिस्तानने भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ताब्यात घेतले, तरीही भारताच्या दबावाखाली त्यांना सोडावे लागले. ऑगस्ट 2019 मध्ये, भारताने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे संविधानातील कलम 370 रद्द केले आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर भारत-पाकिस्तान संबंध पुन्हा बर्फात गाडले गेले. मात्र 2019 मध्ये पंतप्रधान इम्रान खान यांनी करतारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन केलं, ज्यामुळे शीख यात्रेकरूंना व्हिसाशिवाय त्यांच्या पवित्र मंदिरांपैकी एकाला भेट देण्याचा मार्ग मोकळा झाला. इम्रान खान यांनी त्यांच्या कार्यकाळात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप-आरएसएस युतीवर वैयक्तिक हल्ला केला. त्यामुळे मोदी सरकारला त्यांच्याशी राजकीयदृष्ट्या पुढची चर्चा करणे अधिक कठीण झाले. मात्र, आपली पंतप्रधान पदाची खुर्ची जाताना पाहून इम्रान खान अलीकडच्या काळात भारताचे चाहते झाले होते आणि अनेक प्रसंगी त्यांनी भारताची स्तुतीसुमने उधळली होती. नवाझ शरीफ सत्तेत असताना काही प्रसंग वगळता ते भारतासोबतच्या संबंधांबाबत सकारात्मक होते. 2015 मध्ये नवाझ शरीफ यांच्या येथे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पीएम मोदी अचानक लाहोरला पोहोचले होते. आता त्यांचे धाकटे भाऊ शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे वझीर-ए-आझम बनणार आहेत. अशा स्थितीत ते भारतासोबतच्या संबंधांबाबत काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल. पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराच्या मान्यतेशिवाय पानही हलत नाही, असे म्हटले जाते. इम्रान खान यांना पंतप्रधानपदापर्यंत नेण्यात लष्कराची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अलीकडच्या काळात इम्रानचे लष्करासोबतचे संबंध चांगले राहिलेले नाहीत. अनेक प्रसंगी इम्रानने पाकिस्तानी लष्कराच्या जनरल्सवर जाहीरपणे टीका केली. त्यांच्या खुर्ची जाण्यामागे हेही मोठे कारण सांगितले जात आहे. अलीकडच्या काळात भारत आणि विशेषतः काश्मीरबाबत पाकिस्तानी लष्कराची भूमिका मवाळ होत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी अलीकडेच भारत आणि पाकिस्तानमधील सर्व वाद शांततेने सोडवण्याची वकिली केली होती. काश्मीरसह सर्व प्रलंबित प्रश्न मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवण्यावर आमचा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले होते. पाकिस्तानी लष्कराची ही भूमिका कायम राहिल्यास परस्पर संबंधांची नवी फेरी सुरू होण्याची अपेक्षा आहे. पाकिस्तानही सध्या जगात एकाकी पडला आहे. अमेरिका, सौदी अरेबिया आणि यूएई यांसारख्या पारंपारिक मित्र राष्ट्रांपासून स्वतःला वेगळे करून ज्यांनी पाकिस्तानला सावरण्यासाठी दीर्घकाळ मदत केली आहे, ते चीन आणि तुर्कीवर अवलंबून आहेत, जे मदतीच्या नावाखाली त्याचा फायदा घेत आहेत. IPL 2022 : RCB च्या स्टार खेळाडूच्या बहिणीचं निधन, आयपीएल सोडून तातडीनं घरी रवाना  रशिया-युक्रेन युद्धाच्या काळातही इम्रान खाननं एवढी मोठी चूक केली, ज्यासाठी केवळ जगच नाही तर खुद्द पाकिस्तानातील लोकंही त्यांच्या विरोधात गेले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी जवळीक व्यक्त करण्यासाठी इम्रान युद्धानंतर मॉस्कोला पोहोचले. त्यांचा हा डाव केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणासाठीही घातक ठरला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Imran khan, India, Narendra modi, Pakistan, Pakistan army

    पुढील बातम्या