जाहिरात
मराठी बातम्या / देश / राम नवमीच्या मिरवणुकीला गालबोट, दोन गटांत हिंसाचार, एकाचा मृत्यू तर पोलीस अधिकाऱ्यांसह 8 जखमी

राम नवमीच्या मिरवणुकीला गालबोट, दोन गटांत हिंसाचार, एकाचा मृत्यू तर पोलीस अधिकाऱ्यांसह 8 जखमी

रामनवमीच्या मिरवणुकीला गालबोट; दोन गटांत हिंसाचार, एकाचा मृत्यू (Photo: News18 Gujarat)

रामनवमीच्या मिरवणुकीला गालबोट; दोन गटांत हिंसाचार, एकाचा मृत्यू (Photo: News18 Gujarat)

Ram Navami procession: रामनवमी निमित्त देशभरात विविध ठिकाणी मिरवणूक काढण्यात आल्या. मात्र, याच दरम्यान गुजरातमध्ये दोन गटांत वाद झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

गुजरात, 10 एप्रिल : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा निर्बंधांशिवाय सर्वत्र रामनवमी (Ram Navami) साजरी करण्यात आली. देशभरात विविध ठिकाणी मिरवणुका (Ram Navami Procession) काढण्यात आल्या. मात्र, त्याच दरम्यान गुजरात **(Gujarat)**मधील साबरकांठा आणि आणंद येथे दोन गटांत जोरदार वाद झाला आहे. या वादात दगडफेक सुद्धा झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. (Clash between two groups during Ram Navami procession in Gujarat) दोन गटांत झालेल्या या दगडफेकीत एकाचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दगडफेकीत अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी जाळपोळ सुद्धा करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. पोलिसांवरही हल्ला दोन गटांत झालेल्या या वादात जोरदार दगडफेक झाली. या दगडफेकीच्या घटनेत गुजरातमधील खंभात येथील डीवायएसपी जखमी झाले आहेत. तसेच इतरही तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. वाचा :  कबुतर पकडायला गेला अन् 200 फुट खोल विहिरीत पडला, तरुणाचा बुडून मृत्यू राम नवमीच्या मिरवणुकी दरम्यान गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेशमध्ये विविध हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर येथील छापरिया परिसरात रामनवमी निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत हिंसाचार सुरू झाला. यावेळी दगडफेक सुद्धा करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. वाचा :  ब्रिटिशकालीन 100 वर्ष जुना पूल तुटला, 138 चाकी ट्रॉलीचा भीषण अपघात यानंतर आक्रमक झालेल्या जमावाने दुकाने आणि वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळ करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळखांड्या फोडल्या. या घटनेत नागरिकांसोबतच अनेक पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. या घटनेत नेमके किती जण जखमी झाले आहेत याबाबत माहिती अद्याप समजू शकलेली नाहीये. सध्या परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली असून संपूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्येही वाद रामनवमी निमित्ताने पश्चिम बंगालमधील दक्षिण हावडा येथील बीई कॉलेज परिसरातून मिरवणूक जात होती. त्यावेळी जमावाने काहींवर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळातच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. झारखंडमध्ये हिंसाचार झारखंडमधील लोहरदगा येथील हिरही-हेंदलासो-कुजरा गावाच्या सीमेवर जत्रेत हिंसाचार आणि जाळपोळ झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सध्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती आता नियंत्रणात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात