मुंबई, 01 जुलै : RBIच्या नव्या नियमांमुळे आता ऑनलाईन Money Transfer स्वस्त झाले आहे. RTGS आणि NEFTवर कोणतेही शुल्क लावण्यात येणार नसल्याचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं म्हटलं होतं. 1 जुलै अर्थात आजपासून हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे Online व्यवहार करणं आणखी सोप्प झालं आहे. Online Transitionला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं RTGS आणि NEFTवर जास्त पैसे आकारले जाणार नाहीत. मोठी रक्कम पाठवण्यासाठी RTGS केलं जातं. तर, 2 लाखापर्यंतची रक्कम ही NEFTद्वारे पाठवली जाते. पण, Online Transitionला कोणतेची चार्ज आकारले जाणार नाहीत. ऑनलाईन व्यवहारांना चालना देण्यासाठी सरकारनं नवा नियम लागू केला आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे हे नक्की. भाजी आणण्यासाठी 30 रूपये मागितले म्हणून ‘तलाक’ SBIच्या 42 कोटी ग्राहकांना होणार फायदा 1 जुलै म्हणजेच आजपासून रेपो रेटशी संबंधित होम लोन ग्राहकांना दिलं जाणार आहे. त्यामुळे 1 जुलैपासून मिळणारं होम लोन हे त्यावर आधारित असणार आहे. म्हणजेच ज्यावेळी RBI रेपो रेटमध्ये बदल करेल तेव्हा त्याच आधारावर SBIचा व्याज दर ठरलेला असेल. सेव्हिंग खात्याच्या नियमांमध्ये बदल सेव्हिंग खात्याच्या नियमांमध्ये देखील बदल होणार आहे. ठराविक रक्कम खात्यामध्ये ठेवणं बंधनकारक होतं. पण, आता मात्र त्याबाबत सक्ती नसणार आहे. 1 जुलैपासून हा नवा नियम लागू होणार आहे. जम्मू-काश्मीर: किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून 30 यात्रेकरू ठार व्याज दर कमी केंद्र सरकारनं छोट्या योजनांवरील व्याज दरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील छोट्या बचत योजनांवरील व्याज दरात 0.10 टक्के कपात करण्यात आली आहे. म्हणजेच 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंतचं व्याज दर कमी असणार आहे. SPECIAL REPORT : पहिला पाऊस…बघ मला तुझी आठवण येते का?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.