News18 Lokmat

भाजी आणण्यासाठी 30 रूपये मागितले म्हणून ‘तलाक’

Tripal Talaq : भाजी आणण्यास नकार दिल्यानं पतीनं तलाक दिल्याची घटना दादरी येथे समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2019 11:44 AM IST

भाजी आणण्यासाठी 30 रूपये मागितले म्हणून ‘तलाक’

नोएडा, 01 जुलै : सरकार तिहेरी तलाक विधेयक पारित करण्यासाठी प्रयत्न करत असताना देशातील अनेक भागात तिहेरी तलाकच्या घटना समोर येत आहेत. दिल्लीपासून जवळ असलेल्या नोएडातील दादरी येथे पत्नीनं भाजी आणण्यासाठी 30 रूपये मागितले म्हणून तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणात 30 वर्षीय झैनाबनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून यामध्ये सासू – सासऱ्यांनी देखील मारहाण केल्याचं म्हटलं आहे. तर पतीनं स्क्रू ड्रायव्हरनं मारहाण केल्याचं झैनाबनं म्हटलं आहे. शनिवारी पती शबीर, दीर झाकीर आणि इद्रीस, नणंद शमा, सासू नैझी यांनी मारहाण केल्याचं झैनाबनं म्हटलं आहे. तर, मला इलेक्ट्रीक शॉक देत मला पतीनं घटस्फोट देऊन घराबाहेर काढल्याचं झैनाबनं आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

जम्मू-काश्मीर: किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून 30 यात्रेकरू ठार

आणखी काय घडलं?

झैनाबचं माहेर सासरपासून अंदाजे किलोमीटरवरती आहे. मारहाण झाल्यानंतर झैनाबला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. यापूर्वी देखील झैनाबला मारहाण केली जात होती. शिवाय, झैनाबनं कमाई सासूकडे द्यायला नकार दिल्यानंतर देखील तिला सासूनं मारहाण केली.

तर, लग्नामध्ये घातलेले दागिने देण्यास देखील झैनाबनं नकार दिल्यानं देखील तिला बेदम मारहाण केल्याचं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. तर, काही दिवसांपूर्वी आजारी झैनाबला पती शबीर माहेरी घेऊन आला. त्यावेळी त्यानं घटस्फोट देणार असल्याचं सांगितलं होतं. याप्रकरणी आता पती आणि सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading...

पोलिसांनी नवरा शबीरला अटक केली असून त्याला दादरीच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं त्यानंतर त्याला जामिन देखील मंजूर करण्यात आला. तर, घरातील उर्वरित लोक हे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिला आहे.

SPECIAL REPORT : पहिला पाऊस...बघ मला तुझी आठवण येते का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: talaq
First Published: Jul 1, 2019 11:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...