जाहिरात
मराठी बातम्या / देश / जम्मू-काश्मीर: किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून 30 यात्रेकरू ठार Kishtwar | Keshwan | Jammu And Kashmir | Jammu

जम्मू-काश्मीर: किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून 30 यात्रेकरू ठार Kishtwar | Keshwan | Jammu And Kashmir | Jammu

जम्मू-काश्मीर: किश्तवाडमध्ये बस दरीत कोसळून 30 यात्रेकरू ठार Kishtwar | Keshwan | Jammu And Kashmir | Jammu

जम्मू - काश्मीरमधील किश्तवाड येथे झालेल्या बस अपघातामध्ये 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

किश्तवाड, 01 जुलै : जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे बस अपघातात 30 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. बस दरीत कोसळून झालेल्या अपघातामध्ये 30 यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर 22 पेक्षा देखील जास्त जण जखमी झाले आहेत. स्थानिकांना याबाबतची माहिती मिळताच अपघातस्थळी धाव घेत मदतकार्य सुरू करण्यात आले.

News18

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात येत आहे. बस वेगात असल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळून अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये 40 जण प्रवास करत होते. या अपघातात चालकाला देखील आपला जीव गमवावा लागला आहे. अपघात एवढा भीषण होता की, आवाजावरून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनानं देखील मदतकार्याला सुरूवात केली आहे.

जाहिरात

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमी लोकांना बाहेर काढले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बस दरीत कोसळत असताना काहींनी त्यामधून उड्या टाकल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. अपघातात 22 जण गंभीर जखमी असून त्यापैकी 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. SPECIAL REPORT: भाजपच्या प्रवेशासाठी महाजनांच्या घराबाहेर कोण-कोण?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात