मनधरणी नाट्य संपले, अखेर सचिन पायलट यांच्याबद्दल काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

मनधरणी नाट्य संपले, अखेर सचिन पायलट यांच्याबद्दल काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी राहुल गांधी यांच्यापासून ते अहमद पटेल यांनी सर्वांनी प्रयत्न केले

  • Share this:

जयपूर, 14 जुलै : राजस्थानमध्ये सत्ता संघर्षाच्या नव्या नाट्याला आज नवीन वळण लागले आहे. बंडाचा झेंडा फडकवणारे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडून मनधरणीचे प्रयत्न थांबवण्यात आले आहे. काँग्रेसकडून आता सचिन पायलट यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या 24 तासात काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आला. सचिन पायलट यांची मनधरणी करण्यासाठी राहुल गांधी यांच्यापासून ते अहमद पटेल यांनी सर्वांनी प्रयत्न केले. पण, सचिन पायलट हे अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे आता मनधरणीचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहे.

राजगृह हल्ला प्रकरणातील आरोपी दिसला ठाण्यात, पायी चालत गेला दादर ते ठाणे, VIDEO

अखेरीस पायलट यांनी गहलोत यांना मुख्यमंत्रिपदावरुन कधी हटवणार आणि आपल्याला कधी मुख्यमंत्री करणार असं आश्वसान तरी द्यावं, अशी शेवटची मागणी पक्षाकडे केली. पण, पक्षाने त्यांना सीएलपीच्या बैठकीला जाण्याचा सल्ला दिला. तसंच या बैठकीनंतर गहलोत यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. पण, पायलट यांनी बैठकीला जाण्यास नकार दिला.

महिलेने 90 वर्षीय पतीला रॉकेल टाकून पेटवले, नंतर स्वत:लाही संपवलं

त्यामुळे आता सचिन पायलटांविरोधात निर्णायक कारवाई करण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. आज शिस्तभंग केल्याची नोटीस बजावली जाईल. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी आमदारांचे हात उंचावून कारवाई करण्यास सहमती दर्शविली आहे.

राजस्थानमधील राजकीय नाट्याला नवे वळण, सचिन पायलट यांच्या नव्या मागणीने खळबळ

दरम्यान, रविवारी रात्रीपासून राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांनी सचिन पायलट यांच्याशी वारंवार फोनवर संवाद साधला. प्रियांका गांधींनी सचिन पायलट यांच्याशी 4 वेळा फोनवर संवाद साधला. तर काँग्रेसचे चाणक्य असलेले अहमद पटेल यांनी 15 वेळा फोन करून पायलट यांची मनधरणी केली. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी जवळपास 6 वेळा तर केसी वेणुगोपाल यांनी सचिन पायलट यांच्यी 3 वेळा चर्चा केली. काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी चर्चा केल्यानंतरही पायलट आपल्या भूमिकेवर मात्र ठाम राहिले. अखेर आता पायलट यांच्यावर कारवाई होणार हे आता स्पष्ट आहे.

Published by: sachin Salve
First published: July 14, 2020, 1:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading