नवी दिल्ली, 14 जुलै : राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पुकारलेल्या बंडाचा आता दुसरा अंक सुरू झाला आहे. गहलोत यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास पायलट यांनी नकार दिला आहे. पायलट यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची रीघ लागली आहे. तर दुसरीकडे पायलट समर्थकही गहलोत यांच्या विरोधात उतरले आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेसमधील राजकीय नाट्याने नवीन वळण घेतले आहे. अशोक गहलोत यांनी बहुमतासाठी 105 आमदाराचा पाठिंबा असल्याचं सिद्ध केल्यानंतर सरकार स्थिर राहणार असे स्पष्ट झाले होते. पण, त्यानंतर सचिन पायलट आणि त्यांनी समर्थकांनी पक्षात परत येण्यास नकार दिला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा करून मनधरणीचा प्रयत्न केला. पण, पायलट यांनी पक्षात परत येण्यास नकार दिला. पायलट यांनी अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारण्यास स्पष्ट नकार दिली आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, पण गहलोत यांना मुख्यमंत्रिपदी ठेवू नका, अशी मागणीच पायलट यांनी केली आहे.
तरुणानं हात लावताच काढला फुत्कार, चिडलेल्या सापानं काय केलं पाहा VIDEO
एवढंच नाहीतर काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीलाही पायलट आणि त्यांच्या समर्थकांनी नकार दिला. काँग्रेस पक्षाकडून अजूनही सचिन पायलट यांच्यावर कोणतीही कारवाईचे संकेत दिले नाही. सचिन पायलट यांना त्यांच्या आवडीचे खाते देण्याची ऑफरही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसंच, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपद ही कायम राखले जाणार असल्याचंही पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
रविवारी रात्रीपासून राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांनी सचिन पायलट यांच्याशी वारंवार फोनवर संवाद साधला. प्रियांका गांधींनी सचिन पायलट यांच्याशी 4 वेळा फोनवर संवाद साधला. तर काँग्रेसचे चाणक्य असलेले अहमद पटेल यांनी 15 वेळा फोन करून पायलट यांची मनधरणी केली. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी जवळपास 6 वेळा तर केसी वेणुगोपाल यांनी सचिन पायलट यांच्यी 3 वेळा चर्चा केली. काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी चर्चा केल्यानंतरही पायलट आपल्या भूमिकेवर मात्र ठाम आहे.
नुकसान 2.5 लाखाचे, सरकारकडून चेक 5 हजाराचा, शेतकरी म्हणाला,'राहु द्या तुम्हालाच'
तर दुसरीकडे र दिल्लीतील गुडगावमध्ये सचिन पायलट यांना पाठिंबा देणारे पंधरा आमदार आणि तीन अपक्ष आमदार हॉटेल आयटीसी ग्रंडमध्ये थांबलेले आहेत. जोपर्यंत अशोक गहलोत यांची मुख्यमंत्रिपदावरून गच्छंती होत नाही तोपर्यंत हा विरोध सुरू राहील, असा पवित्रा या समर्थक आमदारांनी घेतला आहे.
दरम्यान, सचिन पायलट यांनी थेट मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनाच आव्हान दिले. बहुमत सिद्ध करण्यासाठी हॉटेल ही काही जागा नाही, विधानसभेत गहलोत यांनी विश्वासदर्शक ठराव सिद्ध करावा, असं आवाहनच त्यांनी दिलं आहे. गहलोत यांच्याकडे आमदारांची पाठिंबा नाही, असा दावाही पायलट यांनी केला.