जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महिलेने 90 वर्षीय पतीला रॉकेल टाकून पेटवले, नंतर स्वत:लाही संपवलं

महिलेने 90 वर्षीय पतीला रॉकेल टाकून पेटवले, नंतर स्वत:लाही संपवलं

महिलेने 90 वर्षीय पतीला रॉकेल टाकून पेटवले, नंतर स्वत:लाही संपवलं

लक्ष्मण पाटील आणि पार्वती पाटील असं वृद्ध दाम्पत्याचं नाव आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोल्हापूर, 14 जुलै : वृद्ध पतीला पेटवून पत्नीने आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूरमध्ये (Kolhapur) घडली आहे. आजाराला कंटाळून वृद्ध महिलेने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. चंदगड तालुक्यातील कडलगे गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लक्ष्मण पाटील आणि पार्वती पाटील असं वृद्ध दाम्पत्याचं नाव आहे. लक्ष्मण पाटील आणि पार्वती पाटील हे वृद्ध पती पत्नी एका जुन्या घरात राहात होते. लक्ष्मण पाटील हे गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. पत्नी पार्वती ही त्यांची काळजी घेत होत्या. मात्र आता लक्ष्मण पाटील यांच्या आजाराल कंटाळून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवले आणि त्यानंतर स्वतः पेटवून घेऊन पत्नी पार्वती यांनी जीवन यात्रा संपवली. हेही वाचा - मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाने खाडीत उडी मारून केली आत्महत्या दरम्यान, लक्ष्मण पाटील यांना पहिल्या पत्नीपासून एक आणि दुसरी पत्नी पार्वती यांच्यापासून एक अशी दोन मुले आहेत. मात्र ती दोन्ही मुले वेगवेगळ्या घरात राहात होते, तर हे वृद्ध जोडपे जुन्या घरात राहात होते. सकाळी सहा वाजता मुलगा पुंडलिक आई-वडिलांकडे आल्यानंतर त्याच्या ही बाब लक्षात आली. मुलाने दिलेल्या माहितीनंतर मृत पार्वती पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वृद्ध जोडप्याचा करूण अंत झाल्यानंतर चंदगड तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: kolhapur
  • First Published :
जाहिरात
जाहिरात