जाहिरात
मराठी बातम्या / देश / भरधाव टेम्पो समोरून आला आणि पिकअपवर आदळला, क्षणात झालं होत्याचं नव्हतं!

भरधाव टेम्पो समोरून आला आणि पिकअपवर आदळला, क्षणात झालं होत्याचं नव्हतं!

इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र रुग्ण दाखल झाल्याने रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.

इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र रुग्ण दाखल झाल्याने रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.

भीषण धडकेत टेम्पो पूर्णपणे पलटी झाला आणि त्यात बसलेले सर्व 25 प्रवासी दबले गेले, त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतरांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

  • -MIN READ Local18 Dausa,Rajasthan
  • Last Updated :

आशिष कुमार, प्रतिनिधी दौसा, 16 जून : राजस्थानातून गुरुवारी रात्री एका भीषण अपघाताची माहिती समोर आली. दौसा-टहला मार्गावर बुर्जा गावाजवळ टेम्पो आणि पिकअप गाडीच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला, तर 23 जण जखमी झाले. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ककराली रामपूरचे रहिवासी मंगलराम कोळी (वय 55 वर्ष) आणि बुर्जाचे रहिवासी बक्शीराम कोळी (वय 48 वर्ष) या प्रवाशांनी या अपघातात आपला जीव गमावला. मिळालेल्या माहितीनुसार, अलवर जिल्ह्यातील टहला पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोलाकाबास तहसील क्षेत्रात बुरजा गावाजवळ पिकअप आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत टेम्पो पूर्णपणे पलटी झाला आणि त्यात बसलेले सर्व 25 प्रवासी दबले गेले, त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतरांना तातडीने दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, चारजणांची स्थिती अतिशय गंभीर असल्याने त्यांना रायपूरला हलवण्याचे निर्देश डॉक्टरांनी दिले.

News18लोकमत
News18लोकमत

इतक्या मोठ्या प्रमाणात एकत्र रुग्ण दाखल झाल्याने रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. अशा आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर तातडीने दाखल झाले आणि अन्य डॉक्टरांचं पथकही बोलवण्यात आलं, जेणेकरून जखमींवर वेळेत उपचार होतील. Crime News: शवागाराच्या मॅनेजरचं हादरवणारं कांड; मृतदेहांसोबत करायचा संतापजनक काम, अखेर अटक या अपघाताबाबत टहला पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून 2 मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. तर, ऋषी, सुंदरी, हिरा, ममता, गिर्राज, रामकिशोर, कृष्ण, सुगना, उर्मिला देवी, मनभरी देवी, आनंदी, रमेश, सूरज, मोहनलाल, ललता, उर्मिला यांसह 23 जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात