नवी दिल्ली 16 जून : लोभ माणसाला अनेक वेळा प्राण्यांपेक्षाही वाईट बनवतो. मग त्याला काय चूक आणि का बरोबर हे कळणंही बंद होतं. अनेकदा एखादी व्यक्ती इतकी खालच्या पातळीवर उतरते की ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करते. त्याला इतरांच्या भावनांची पर्वा नसते. सध्या अमेरिकेतील एक व्यक्ती त्याच्या वाईट कृत्यांमुळे चर्चेत आहे, लोभामुळे त्याने असं काम केलं की आता त्याला तुरुंगात जावं लागलं आहे. डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, हार्वर्डसारख्या प्रसिद्ध मेडिकल स्कूलमधून हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. वैद्यकीय शाळेच्या शवागाराचा व्यवस्थापक मृतदेहांचा व्यवसाय करत असल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सेड्रिक लॉज (वय 55) हार्वर्ड अॅनाटॉमिकल गिफ्ट प्रोग्राम अंतर्गत बांधलेल्या शवागाराचा दीर्घकाळ व्यवस्थापक होता. कॉलेजला वैज्ञानिक संशोधनासाठी दान केलेले मानवी मृतदेह तो पैशासाठी विकायचा, असा आरोप आहे. एस्कॉर्टच्या नावाखाली 100 जणांना लुटलं; अल्पवयीन मुलाला लाखाचा गंडा, टोळीचा पर्दाफाश पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो हे अवयव फेसबुक या सोशल मीडिया साइटवर विकायचा. सेड्रिक डोकं, मेंदू, त्वचा आणि हाडे यांसारखे अवयव त्याच्या गावी घेऊन जायचा आणि तिथून फेसबुकवर त्यांची विक्री करायचा. या गुन्ह्यात तो एकटा नव्हता. सेड्रिक व्यतिरिक्त, त्याची 63 वर्षीय पत्नी डेनिस, सालेममधील 44 वर्षीय महिला कॅटरिना मॅक्लीन, वेस्ट लॉनचा 46 वर्षीय जोशुआ टेलर आणि पूर्व बेथलमधील 52 वर्षीय मॅथ्यू लॅम्पी यांचीही नावे आहेत. हे सर्व लोक मिळून हे रॅकेट चालवत होते. यापैकी सेड्रिक हा अवयव चोरायचा, नंतर दुसरा साथीदार तिसऱ्याला द्यायचा. या लोकांनी मानवी त्वचेपासून पिशव्या बनवल्या, डोक्याचा वापर केला आणि नंतर फेसबुकच्या माध्यमातून ते विकल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. अशा प्रकारे ते लोक मानवी शरीरापासून बनवलेल्या वस्तू काळ्या बाजारात विकायचे. हे रॅकेट 2018 ते 2022 पर्यंत सुरूच होते. यादरम्यान त्यांनी 80 लाखांहून अधिक रुपयांचा व्यवहार केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.