जाहिरात
मराठी बातम्या / देश / अनोखं श्रावण मिलन; 20 हजार नागरिकांनी घातली शहराला प्रदक्षिणा, कारणही आहे खास

अनोखं श्रावण मिलन; 20 हजार नागरिकांनी घातली शहराला प्रदक्षिणा, कारणही आहे खास

शहर प्रदक्षिणा करत नागरिकांनी 12 तासांत 15 किलोमीटरचं अंतर पार केलं.

शहर प्रदक्षिणा करत नागरिकांनी 12 तासांत 15 किलोमीटरचं अंतर पार केलं.

पुरुषोत्तम हे भगवान विष्णूचं दुसरं नाव. शिवाय अधिक मासाचं दैवतही विष्णूलाच मानलं जातं. त्यामुळे अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं म्हणतात.

  • -MIN READ Local18 Barmer,Rajasthan
  • Last Updated :

मनमोहन सेजू, प्रतिनिधी बाडमेर, 24 जुलै : तब्बल 19 वर्षांनंतर यंदा अधिक श्रावण मास आला आहे. याला ‘मलमास’ किंवा ‘पुरुषोत्तम मास’ असंही म्हणतात. हिंदू धर्मात श्रावणाला अत्यंत महत्त्व आहे. हा महिना पवित्र मानला जातो. यानिमित्ताने राजस्थानच्या बाडमेर जिह्यातील जवळपास 20 हजार नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या शहराला प्रदक्षिणा घातली. यामध्ये पुरुषांच्या साथीला महिलाही सहभागी झाल्या होत्या. शिवाय वृद्ध व्यक्तींमध्येही खास उत्साह पाहायला मिळाला. पहाटे सुरू झालेल्या या प्रदक्षिणेने सायंकाळपर्यंत 15 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या प्रार्थनेच्या तुलनेत अधिक मासात केलेल्या धार्मिक कार्याचं फळ 10 पटीने अधिक मिळतं, अशी मान्यता आहे. त्यामुळेच भक्त या महिन्यात संपूर्ण श्रद्धेने देवापुढे नतमस्तक होतात, देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. याचाच एक भाग म्हणून बाडमेर शहरातील श्री बालाजी मंदिरापासून सकाळी 5 वाजता या प्रदक्षिणेला सुरुवात झाली. शहर प्रदक्षिणा करत भाविकांनी 12 तासांत 15 किलोमीटरचं अंतर पार केलं. यात्रेत हजारो भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

News18लोकमत
News18लोकमत

पुरुषोत्तम हे भगवान विष्णूचं दुसरं नाव. शिवाय अधिक मासाचं दैवतही विष्णूलाच मानलं जातं. त्यामुळे अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. यानिमित्ताने बाडमेरमध्ये श्री बालाजी मंदिरापासून सकाळी 5 वाजता सुरू झालेली प्रदक्षिणा 8 वाजता गोपाळ गोशाळेत थांबली. तासाभराच्या विश्रांतीनंतर प्रदक्षिणेला पुन्हा सुरुवात झाली. सचिन फक्त एक मोहरा? सीमाचा उद्देश वेगळाच? वाचा महत्त्वाची अपडेट ही प्रदक्षिणा आयोजित करणाऱ्या समितीतील खजिनदार बंशीलाल अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2 ते 4 या वेळेत अधिकमास कथा आणि भजन-प्रवचनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात