Home /News /national /

पेट्रोल, डिझेलसह गॅसदरात मोठी कपात, पुण्यात राजगर्जना, पाऊस दक्षिण महाराष्ट्राला पुन्हा झोडपणार? TOP बातम्या

पेट्रोल, डिझेलसह गॅसदरात मोठी कपात, पुण्यात राजगर्जना, पाऊस दक्षिण महाराष्ट्राला पुन्हा झोडपणार? TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

    मुंबई, 22 मे : महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने अखेर दिलासा दिला आहे. पेट्रोल डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी करण्यात आलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज पुण्यात (Raj Thackeray in Pune) सभा होणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन मुख्यमंत्री संभाजीराजे छत्रपती यांच्यात चर्चा झाली आहे. पाऊस दक्षिण महाराष्ट्राला पुन्हा झोडपणार असल्याचा अंदाज हवामानखात्याने दिला आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसदरात मोठी कपात महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने अखेर दिलासा दिला आहे. माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या, "आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी (Petrol Diesel Price) कमी होणार आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. पुण्यात राजगर्जना... मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज पुण्यात (Raj Thackeray in Pune) सभा होणार आहे. सकाळी 10 वाजता गणेश कला क्रीडाच्या सभागृहात या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यापूर्वी राज ठाकरेंची सभा 21 मे रोजी सायंकाळी होणार होती. सभेला परवानगी दिली असली तरी राज ठाकरेंच्या सभेसाठी काही अटी-शर्थी देण्यात आल्या आहेत. या नियमांचं उल्लंघन केलं तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कोणाला उमेदवारी? राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) अपक्ष निवडणूक लढण्याचं जाहीर केलं. तर शिवसेनेने सुद्धा या जागेवर आपला उमेदवार देण्याचं म्हटलं आहे. यानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीत काय झालं? याबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग नागपूर दौरा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे नागपूरमध्ये आहेत. डिफेन्स अधिकाऱ्यांसोबत विमानतळावर एक बैठक आहे. त्यानंतर ते केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या घरी जाणार आहेत. साधारण दोन तासाचा हा दौरा आहे. पाऊस दक्षिण महाराष्ट्राला पुन्हा झोडपणार? मागच्या दोन दिवसांत कोल्हापूर, सांगली, सोलापूर (kolhapur, sangli, solapur) जिल्ह्यांना मान्सून पूर्व पावसाने (pre monsoon rain) थैमान घातले होते. काल (दि. 21 मे) पावसाने दिवसभरात पावसाने थोडी उसंत दिली आहे. दरम्यान हवामान खात्याकडून पुन्हा (imd alert) पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. गोवा, कर्नाटक आणि लागून असलेल्या दक्षिण महाराष्ट्राच्या अरबी समुद्र किनाऱ्यावर तसेच केरळ घाट परिसरात मोठे ढग साचून आल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर होणार देशव्यापी आंदोलन! आयबीचा गंभीर इशारा सध्या देशभर ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) व्हिडिओग्राफिक सर्व्हेचं (Video-graphic Survey) प्रकरण गाजत आहे. हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता असल्याचा इशारा इंटेलिजन्स ब्युरोनं (IB) दिला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Petrol and diesel price, Raj thackarey

    पुढील बातम्या