मुंबई, 21 मे : मागच्या दोन दिवसांत कोल्हापूर, सांगली, सोलापूर (kolhapur, sangli, solapur) जिल्ह्यांना मान्सून पूर्व पावसाने (pre monsoon rain) थैमान घातले होते. दरम्यान आज (दि. 21 मे) पावसाने दिवसभरात पावसाने थोडी उसंत दिली आहे. दरम्यान हवामान खात्याकडून पुन्हा (imd alert) पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. गोवा, कर्नाटक आणि लागून असलेल्या दक्षिण महाराष्ट्राच्या अरबी समुद्र किनाऱ्यावर तसेच केरळ घाट परिसरात मोठे ढग साचून आल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. (weather forecast)
याचबरोबर मान्सूनची वाटचाल बरोबर चालू असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान IMD ने दिलेल्या माहितीनुसार , मान्सून येत्या दोन दिवसांत आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत केरळच्या सीमेवर येण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून सक्रीय होण्यासाठी 12 ते 15 जून उजाडण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाची अधिकृत तारीख 11 जून असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दरम्यान राज्यातील काही भागात मान्सून पूर्व हवामान तयार होत असल्याने पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून नियोजित वेळेच्या एक आठवडा अगोदर २२ मे ऐवजी १५ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर पोहोचला. आता केरळमध्ये २७ मेपर्यंत आणि त्यानंतर मुंबईत 5 ते 6 जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. अशात हवामानतज्ज्ञ दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, मान्सूनचा आतापर्यंत प्रवास चांगला राहिल्यामुळे २० ते २१ मे रोजी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Latest satellite obs at 11.45 am, 21/05, Scattered type Clouds observed over Goa Karnataka and adjoining Arabian sea, parts of S Maharashtra & ghat areas of Kerala. Watch for updates from IMD please.
No change in position of Monsoon advancement line today - IMD pic.twitter.com/n8yX4YqpJF — K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 21, 2022
राज्यातील काही भागात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे दरम्यान हा पाऊस कदाचीत हुलकावणी देण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पाऊस असल्याने कदाचित हा पाऊस थांबल्यानंतर पुढचे काही दिवस पाऊस नाही लागल्यास पेरणी केलेल्या पिकाचे मोठे नुकसान होते. यासाठी आज कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आवाहनही केले.
हे ही वाचा : हाताला रोजगार नसल्याने निवडला अवैध मार्ग; 23 वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात
राज्यात हवामान विभागाने (imd alert) दिलेल्या माहितीनुसार मागच्या २४ तासांपासून कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे.(kolhapur, sangli satara heavy rainfall) दरम्यान मान्सून पूर्व पावसाने (Pre-monsoon rains) अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची (farmer) ऐनवेळी मोठी धावपळ झाली आहे. शेतीची मशागतीची कामे जिथल्या तिथे थांबली तर उन्हाळी सोयाबीन, केळी, द्राक्ष बागायतदारांना याचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरूंदवाड येथे एका शेतकऱ्याने थेट सोयाबीन फेकून दिले तर पंढपूरच्या शेतकऱ्यांचे केळी बागेचे मोठे नुकसान झाले आहे.
उन्हाळी सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू असताना, गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने सोयाबीन कापणीत मोठी अडचण निर्माण झाली आहे. सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे आधीच शेतकऱ्याची फसवणूक झाली असताना, हे दुहेरी संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. वादळी पावसाने खरिपाचा हंगाम धोक्यात आल्याचे कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पहायला मिळाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon, Mumbai rain, Rain in kolhapur, Todays weather, Weather forecast, Weather update