मराठी बातम्या /बातम्या /देश /ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर होणार देशव्यापी आंदोलन! आयबीचा गंभीर इशारा

ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर होणार देशव्यापी आंदोलन! आयबीचा गंभीर इशारा

सध्या देशभर ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) व्हिडिओग्राफिक सर्व्हेचं (Video-graphic Survey) प्रकरण गाजत आहे. हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता असल्याचा इशारा इंटेलिजन्स ब्युरोनं (IB) दिला आहे.

सध्या देशभर ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) व्हिडिओग्राफिक सर्व्हेचं (Video-graphic Survey) प्रकरण गाजत आहे. हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता असल्याचा इशारा इंटेलिजन्स ब्युरोनं (IB) दिला आहे.

सध्या देशभर ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) व्हिडिओग्राफिक सर्व्हेचं (Video-graphic Survey) प्रकरण गाजत आहे. हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता असल्याचा इशारा इंटेलिजन्स ब्युरोनं (IB) दिला आहे.

  मुंबई, 21 मे : सध्या देशभर ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) व्हिडिओग्राफिक सर्व्हेचं (Video-graphic Survey) प्रकरण गाजत आहे. हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता असल्याचा इशारा इंटेलिजन्स ब्युरोनं (IB) दिला आहे.  दिल्ली-एनसीआरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलिसांची (Delhi Police) स्पेशल सेल (Special cell) आणि स्पेशल ब्रँचची (Special Branch) टीम गेल्या एका आठवड्यापासून अत्यंत सतर्क आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थेला (IB) काही दिवसांपूर्वी एक इनपूट मिळालं होतं. ज्ञानवापी मशीद प्रकरण, अल्पसंख्याकांशी संबंधित मुद्दे, मदरसा आणि द प्लेसेस ऑफ वर्शिप अ‌ॅक्ट 1991 (Places of Worship Act) या बाबत अफवा (Rumors)  पसरवून विशिष्ट धर्माचं देशव्यापी आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न होईल. केंद्र सरकार (Central Government) आणि उत्तर प्रदेश सरकारचा (UP Government) या आंदोलनातून विरोध केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती आयबीला मिळाली होती.

  या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गुप्तचर संस्थेनं दिल्ली पोलीस मुख्यालयातील (Delhi Police Headquarters) वरिष्ठ अधिकारी आणि उत्तर प्रदेशसह (UP) अन्य राज्यांच्या पोलीस अधिकार्‍यांसाठी एक अलर्ट नोट (Alert Note) शेअर केली आहे. आयबीच्या सूत्रांनुसार, हा अलर्ट तीन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला आहे. परंतु, प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता दिल्ली पोलीस किंवा यूपी पोलीस दलातील अधिकारी या विषयावर औपचारिकपणे काहीही बोलण्यास तयार नाहीत.

  वृंदावन तीर्थाशी संबंधित 'या' आठ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या, सविस्तर माहिती

  देशव्यापी आंदोलनाचा प्रयत्न

  एका विशेष सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशातील काही जिल्हे आणि इतर काही राज्यांमध्ये ज्ञानावापी मशिदीशी संबंधित मुद्द्यावर मोठं आंदोलन उभारण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी वातावरण तयार केलं जात आहे. या चर्चेदरम्यान बोलताना काही लोकांनी CAA-NRC आणि शेतकरी आंदोलनासारखं देशव्यापी आंदोलन उभं करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Zoom Meeting) ही चर्चा करण्यात आली.

  सूत्रांनुसार, शुक्रवारी नमाज अदा केल्यानंतर ज्येष्ठ मौलानांनी मशिदीत बसून ज्ञानवापी संबंधित मुद्द्यावर चर्चा करावी. या मुद्द्यावर मुस्लिम धर्माशी संबंधित लोकांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचा प्लॅन तयार करावा, अशीही चर्चा या झूम मिटिंगमध्ये झाली. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आणि वाराणसीच्या जिल्हा कोर्टात असल्याची आठवणही काही सहभागी लोकांनी करून दिली. या विषयावर एकजुटीने चर्चा केली तर सरकारवर दबाव येईल व निकाल आपल्या बाजूने येईल, अशी शक्यताही यावेळी वर्तवण्यात आली.

  ''जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न..'',लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

  केंद्र सरकारवर आरोप

  ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ (All India Muslim Personal Law Board (AIMPLB) बोर्डाच्या एक्झिक्युटिव्ह समितीच्या सदस्यांनी दोन दिवसांपूर्वीच एक प्रेस रिलीज जारी केली होती. त्यात ज्ञानवापी मशीदीच्या प्रश्नात केंद्र सरकार, काही राज्यांतील सरकारं आणि काही राजकीय पक्षांचा निषेध करण्यात आला होता. ही सर्व मंडळी ज्ञानवापी प्रश्नाबाबत मूग गिळून गप्प बसली आहेत त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करत आहोत, असं या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं होतं. या प्रेस रिलीजमध्ये असंही सांगण्यात आलं की, 'काही द्वेष पसरवणाऱ्या शक्ती (Hate Mongering Forces) खोटा प्रचार करून मुस्लिम धार्मिक स्थळांना विनाकारण टार्गेट करत आहेत. केंद्र सरकार याबाबत मौन बाळगून आहे. असं करून सरकार एकप्रकारे गुन्हाच करत आहे. सरकारची ही भूमिका कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाऊ शकत नाही. ज्ञानवापी मुद्द्यावर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून असं आवाहन करण्यात आलं आहे की, पुढील तीन आठवडे नमाजानंतर मशिदींचं महत्त्व (Importance of Mosques) आणि शरियतमधील त्यांचं पावित्र्य हे दुहेरी मुद्दे सर्व लोकांसमोर ठेवावेत आणि त्याबाबत जागरुकता निर्माण करावी.

  दरम्यान, ज्ञानवापी प्रकरण आता वाराणसी (Varanasi) येथील जिल्हा न्यायालयात (District Court) आहे. शुक्रवारीच सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) हे प्रकरण वाराणसी न्यायालयाकडे (Varanasi District Court) वर्ग केलं आहे. येत्या आठ आठवड्यांत या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

  First published:

  Tags: Delhi Police, Uttar pardesh