Home /News /national /

BREAKING | महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल, डिझेल आणि गॅसदरात मोठी कपात

BREAKING | महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल, डिझेल आणि गॅसदरात मोठी कपात

Petrol Diesel Price : महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने अखेर दिलासा दिला आहे.

  नवी दिल्ली, 21 मे : महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने अखेर दिलासा दिला आहे. माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या, "आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी (Petrol Diesel Price) कमी होणार आहेत. यामुळे सरकारच्या महसुलावर दरवर्षी सुमारे एक लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 200 रुपये अनुदान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना आता प्रति सिलिंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी दिली जाईल, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल, असे ते म्हणाले. यामुळे वार्षिक सुमारे 6100 कोटींच्या महसुलावर परिणाम होईल. गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये देशातील किरकोळ महागाईचा दर 7.79 टक्क्यांच्या 8 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. किरकोळ महागाईच्या आकडेवारीत ही वाढ खाद्यपदार्थांव्यतिरिक्त इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे झाली आहे.

  'कोणालाच आरक्षण देऊ नका', ब्राह्मण संघटनेच्या या मागणीवर पवारांचे सडेतोड उत्तर, म्हणाले...

  पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट होतात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केल्या जातात. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात. पेट्रोल आणि डिझेलची किंमत घरबसल्या जाणून घेऊ शकता तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (How to check diesel petrol price daily). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
  First published:

  Tags: Gas, Petrol and diesel price

  पुढील बातम्या