दिल्ली, 7 सप्टेंबर : वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या वडिलानांच अटक करण्यात आली आहे. छत्तीसगढचे (Chhattisgarh) मुख्यमंत्री भूपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांचे वडील नंद कुमार बघेल (NandKumar Baghel) यांना रायपूर पोलिसांनी (Raipur Police) आग्र्यातून अटक केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला आणखी एक नवीन वळण लागले आहे. आपल्याच वडिलांना अटक करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी भूपेश बघेल यांनी दिले होते. त्यामुळे आता छत्तीसगढमध्ये काहीच आलबेल नसल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांच्या विरोधात राजधानी रायपुरातील डी. डी. नगर पोलीसांमध्ये कलम 153, 505 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एक विद्यमान मुख्यमंत्रीच आपल्या वडिलांना तुरूंगात टाकत असल्याने राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या प्रकणावर रोकठोक भुमिका घेताना माझ्या राज्यात कायदा हा सर्वांना समान आहे, जर माझा बाप असेल तरीही असा कणखर पवित्रा घेतला होता.
'त्या' वक्तव्याने माझ्या ज्ञानात भर पडली, शरद पवारांचा मोहन भागवतांना टोला
त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली, असं बोललं जात आहे. रायपूर पोलीसांना त्यांच्याविरोधात तक्रारी मिळाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना अटक करण्यासाठी सर्च अॉरेशन सुरू केले होते. त्यानंतर त्यांना पोलीसांनी शोधून आग्र्यातून अटक केली आहे. आधीच छत्तीसगढमध्ये कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असताना आता यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता या अटकेवर भारतीय जनता पक्षाचे नेते काय प्रतिक्रिया देतात, हे ही फार महत्त्वाचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.