Home /News /pune /

सरसंघचालकांच्या 'त्या' वक्तव्याने माझ्या ज्ञानात भर पडली : शरद पवार

सरसंघचालकांच्या 'त्या' वक्तव्याने माझ्या ज्ञानात भर पडली : शरद पवार

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे, 7 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लिम यांचे पूर्वज एकच असल्याचं म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देत शरद पवारांनी म्हटलं, "मोहन भागवतांनी केलेल्या वक्तव्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडलीय". नेमकं काय म्हणाले शरद पवार? चांगली गोष्ट आहे, सर्व धर्म एकच समजतात तर... हे दोन्ही समाजाचा मूळ जन्म एकाच कुटुंबातून झाला आहे. सर्वांचं मुळ एकच ही माझ्या ही ज्ञानात भरच पडली आहे असं म्हणत शरद पवारांनी सरसंघचालकांनी केलेल्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही प्रत्येक भारतीयाला हिंदू मानतो' मोहन भागवतांनी साधला मुस्लिम समाजाशी संवाद! मोहन भागवतांनी काय म्हटलं होतं? सरसंघचालक मोहन भागवत मुंबई दौऱ्यावर होते. सोमवारी ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी या संस्थेच्या वतीने आय़ोजित केलेल्या राष्ट्र प्रथम, राष्ट्र सर्वोतोपरी या विषयावर मोहन भागवतांनी आपली भूमिका मांडली. यावेळी मोहन भागवतांनी म्हटलं, भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिम यांचे पूर्वज एक आहेत. देश पुढे जायचा असेल तर सर्वांना सोबत जावे लागले. आमच्यासाठी हिंदू हा शब्द आहे, मातृभूमी, गौरवशाली परंपरा आणि आपले पूर्वज यांचा प्रतिशब्द आहे. ईडीच्या कारवाया म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा भावना गवळी यांच्या 3-4 शिक्षण संस्था आहेत. जिथं गैरव्यवहर झाला असेल तिथे त्याची तक्रार राज्य सरकारच्या गृह खात्यात करता येते. तरी ईडी येऊन चौकशी करते कशी? राज्याच्या अधिकारावर गदा आहे. अधिकाराचा गैरवापर होत असेल तर चुकीचं आहे. कायदेशीर लढाई वर भाष्य करणं योग्य नाही पण इतक्या वर्षात ईडीच्या कारवाया ऐकल्या नव्हत्या असंही शरद पवार म्हणाले.
First published:

Tags: Pune, Sharad pawar

पुढील बातम्या