Home /News /national /

ज्योतिरादित्यांबद्दल अखेर राहुल गांधी यांनी मौन सोडलं; जवळच्या मित्राबद्दल दिली पहिली प्रतिक्रिया

ज्योतिरादित्यांबद्दल अखेर राहुल गांधी यांनी मौन सोडलं; जवळच्या मित्राबद्दल दिली पहिली प्रतिक्रिया

ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जातात. आपल्या जवळच्या सहकाऱ्याने पक्ष सोडल्यानंतरही त्यावर राहुल गांधी यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती.

    नवी दिल्ली, 11 मार्च : काँग्रेसला मोठा धक्का देत ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजप प्रवेश केला. मध्य प्रदेशातलं काँग्रेस सरकार यामुळे अडचणीत आलं आहे. ज्योतिरादित्य हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जातात. आपल्या जवळच्या सहकाऱ्याने पक्ष सोडल्यानंतरही त्यावर राहुल गांधी यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून ज्योतिरादित्य यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही मिनिटातच ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षातून हटवल्याची घोषणा काँग्रेसतर्फे करण्यात आली. या सर्व प्रकरणावर पहिल्यांदाच राहुल बोलले आहेत. तुम्ही ज्योतिरादित्य यांना भेटणार नाही का, या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर राहुल म्हणाले, "आम्ही चांगले मित्र आहोत. ज्योतिरादित्य माझ्याबरोबर एकाच कँपसमध्ये होते. माझ्या घरी कुठल्याही वेळी येऊ शकेल अशी एकमेव व्यक्ती म्हणजे ज्योतिरादित्य. आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकलो." वाचा - मध्य प्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात येईल का? शरद पवारांनी दिले उत्तर कुठलीही राजकीय शेरेबाजी करणं राहुल गांधी यांनी टाळलं. काँग्रेसला रामराम करत भाजपवासी होण्याआधी कित्येक महिने ज्योतिरादित्य नाराज होते, असं त्यांचे काही समर्थक सांगतात. NDTV ने दिलेल्या बातमीनुसार, गेल्या काही महिन्यांत ज्योतिरादित्य यांनी राहुल गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण राहुल यांनी त्यांना भेटायची वेळ दिली नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांचे भाऊ आणि त्रिपुराच्या राजघराण्यातील व्यक्ती प्रद्योत देबबर्मा यांनी ही माहिती दिली आहे. प्रद्योत देबबर्मा म्हणाले, "ज्योतिरादित्य शिंदे यांनी कित्येक महिन्यांपासून राहुल यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. पण त्यांना आमच्या नेत्याची मिळू शकली नाही." देबबर्मा हे त्रिपुरा काँग्रेसचे नेतेही आहेत. दिल्लीत भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश करताना ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसमध्ये वावरतानाची व्यथा स्वतःच व्यक्त केली. "वास्तवाला नाकारणं, नव्या विचारांना जागा न देणं, नव्या नेतृत्वाला मान्यता न मिळणं या वातावरणात काम करणं अवघड आहे. राष्ट्रीय स्तरावर हीच स्थिती आहे. तीच स्थिती माझ्या राज्यात - मध्य प्रदेशात आहे", असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. अन्य बातम्या भाजप प्रवेश करताना ज्योतिरादित्य शिंदे झाले भावुक; मोदींवर उधळली स्तुतिसुमनं राज्यसभेच्या 'त्या' जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी? शरद पवार विधानभवनात दाखल
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या