मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मध्य प्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात येईल का? शरद पवारांनी दिले उत्तर

मध्य प्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात येईल का? शरद पवारांनी दिले उत्तर

'कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांना विश्वास आहे. ते काही करू शकतात का बघावे लागेल. परंतु, सिंधिया राजे यांच्या समवेत चर्चा संवाद व्हायला हवा होता'

'कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांना विश्वास आहे. ते काही करू शकतात का बघावे लागेल. परंतु, सिंधिया राजे यांच्या समवेत चर्चा संवाद व्हायला हवा होता'

'कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांना विश्वास आहे. ते काही करू शकतात का बघावे लागेल. परंतु, सिंधिया राजे यांच्या समवेत चर्चा संवाद व्हायला हवा होता'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 11 मार्च : मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे ( jyotiraditya scindia) यांनी काँग्रेसची साथ सोडल्यामुळे कमलनाथ यांच्यापुढे अडचणी वाढल्या आहे. महाराष्ट्रातही अशी परिस्थिती निर्माण होईल का? अशी राजकीय चर्चा सुरू आहे. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या चर्चेवर पडदा टाकला आहे.

शरद पवार यांनी आज राज्यसभेसाठी खासदारकीचा अर्ज भरला. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असतांना त्यांनी मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या राजकीय नाट्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

'मध्य प्रदेशात सरकार हे गेले नाही. कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर लोकांना विश्वास आहे. ते काही करू शकतात का बघावे लागेल. परंतु, सिंधिया राजे यांच्या समवेत चर्चा संवाद व्हायला हवा होता. कदाचित तिथ कमी काही झाले असावे', असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. तसंच, 'काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्व आहे, कर्तृत्त्व ही आहे आणि भविष्यही आहे', असंही पवार सांगायला विसरले नाही.

'राज्यात वेगळं काही घडणार नाही'

यावेळी, पत्रकारांनी मध्य प्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवणार का असा प्रश्न विचारला असता, शरद पवारांनी आपल्या शैलीत याचे उत्तर दिले. 'मध्य प्रदेशात जे राजकीय नाट्य घडले आहे. तशी परिस्थिती महाराष्ट्रात काही येणार नाही. महाराष्ट्र मला राजकीय स्थितीची जाण आहे. त्यामुळे मला वाटते इथं वेगळं काही घडेल असं वाटत नाही', असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

'महाविकास आघाडीला 100 टक्के मार्क्स'

तसंच, 'महाविकास आघाडीला 100 दिवस पूर्ण झाले आहे. 100 दिवसांमध्ये जे काम झालं ते चांगल्या प्रकारे झालं आहे. असं सांगत शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या 100 दिवसाच्या कारभाराला 100 टक्के मार्क्स दिले आहे.

मनसेच्या शॅडो कॅबिनेटवरुन पवारांचा टोला

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर नजर ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट स्थापन केली आहे. शरद पवार यांनी मनसेच्या या भूमिकेवर टोला लगावला आहे. 'एखाद्या पक्षाने सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी केले असेल तर चांगले आहे. मुळात काही तरी केले पाहिजे आणि लोकांसमोर गेले पाहिजे', असा टोला पवारांनी मनसेला लगावला.

'आयपीएलमध्ये गर्दी टाळावी'

आयपीएलच्या सामन्यात मोठ्या संख्येनं लोक एकत्र येतात. ते टाळले पाहिजे. कोरोना व्हायरस गंभीर दखल घेतली पाहिजे. शक्यतो सभा, मेळावे घ्यायला नको, असं आवाहनहीपवारांनी केलं.

प्रफुल पटेल यांची काँग्रेसवर टीका

दरम्यान, काँग्रेस पक्षाने मध्य प्रदेशात परिस्थतीत योग्य पद्धतीने हाताळली नाही म्हणून ही स्थिती आली. योग्य पद्धतीने हाताळले असते तर ही स्थिती आली नसती, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली. तसंच, 'मध्य प्रदेशात अंतर्गत काँग्रेस विषय आहे. मला मध्य प्रदेशात आताच सरकार धोक्यात आल्याचे दिसत नाही', असंही पटेल म्हणाले.

'मध्य प्रदेश प्रमाणे राज्यात स्थिती येणार नाही. राज्य सरकार समन्वय साधून काम करत आहे. त्यामुळे अशी कोणतीही अडचण इथं येणार नाही', असंही पटेल यांनी सांगितलं.

'काँग्रेससोबत आज चर्चा करून उद्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेचा अर्ज दाखल करण्यात येईल, आज शरद पवार यांनी अर्ज दाखल केला', अशी माहितीही पटेल यांनी दिली.

First published: