नवी दिल्ली, 26 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज सकाळी 11 वाजता 'मन की बात' (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमाद्वारे (Radio Program) देशाला संबोधित करणार आहेत. मोदींच्या या कार्यक्रमाचा आज होणारा हा भाग 81 वा असेल. तसंच आजचा कार्यक्रम अखिल भारतीय रेडिओ (All India Radio) आणि दूरदर्शनच्या (Doordarshan) संपूर्ण नेटवर्क आणि मोबाईल अॅपवर प्रसारित केलं जाणार आहे. डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय (PMO) आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवरही (YouTube channels) हा कार्यक्रम उपलब्ध असेल, असं एका अधिकृत निवेदनात सांगण्यात आलं आहे.
याआधी 29 ऑगस्ट रोजी झालेल्या मोदींच्या 'मन की बात' मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या 80 व्या आवृत्तीत, पंतप्रधान मोदींनी बिहारमधील कृषी विज्ञान केंद्र आणि तामिळनाडूतील कांजीरंगल पंचायतीच्या गावातील कचरा व्यवस्थापन आणि इतर उपक्रमांसाठी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं होतं. 'मन की बात' हा पंतप्रधानांच्या अभिभाषणाचा मासिक रेडिओ कार्यक्रम आहे, जो प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम अशा वेळी प्रसारित केला जात आहे जेव्हा ते अमेरिकेच्या दौऱ्यावरून मायदेशी परतत आहेत. अमेरिका दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 76 व्या सत्राला संबोधित केले आणि त्यापूर्वी थेट क्वाड शिखर परिषदेत भाग घेतला.
याशिवाय मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, अमेरिकेचे उपाध्यक्ष कमला हॅरिस तसंच त्यांच्या ऑस्ट्रेलियन आणि जपानी समकक्षांबरोबर द्विपक्षीय आणि बहुपक्षीय कार्यक्रमांना उपस्थिती लावली. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील पाच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेट घेतली. याशिवाय त्यांनी ग्लोबल सिटीझन लाईव्ह समिटलाही संबोधित केले.
Published by:Pooja Vichare
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.