Home /News /national /

घरात 4 पेक्षा जास्त दारूच्या बाटल्या ठेवायच्यात? मग बारचे लायसन्स घ्या, या सरकारचा अनोखा निर्णय

घरात 4 पेक्षा जास्त दारूच्या बाटल्या ठेवायच्यात? मग बारचे लायसन्स घ्या, या सरकारचा अनोखा निर्णय

दारू घरात बाळगण्याविषयी प्रत्येक राज्यांचे वेगवेगळे नियम आहेत. उत्पादन शुल्क विभागाने घालून दिलेल्या मर्यादेत आपण घरी मद्य बाळगू शकतो, घरात मद्याचा साठा करून ठेवणे नियमबाह्य आहे.

    लखनऊ, 25 सप्टेंबर : अनेकांना आपल्या घरातील फ्रीजमध्ये किंवा इतर ठिकाणी बियर, वाईनसह (Wine) मद्याच्या बाटल्या ठेवण्याची सवय असते. दारू घरात बाळगण्याविषयी प्रत्येक राज्यांचे वेगवेगळे नियम आहेत. उत्पादन शुल्क विभागाने घालून दिलेल्या मर्यादेत आपण घरी मद्य बाळगू शकतो, घरात मद्याचा साठा करून ठेवणे नियमबाह्य आहे. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने अनोखा निर्णय घेतला आहे. यूपीमध्ये आता तुम्ही वाइनच्या 4 बाटल्या घरी ठेवू शकता, त्यापेक्षा अधिक बाटल्या घरात ठेवण्यासाठी मग बारचा परवाना (home bar license) घ्यावा लागू शकतो. उत्तर प्रदेशात (Uttar pradesh) उत्पादन शुल्क विभागाने नवीन नियम जारी केला आहे. यूपीमध्ये आता तुम्ही वाइनच्या 4 बाटल्या घरी ठेवू शकता. अधिकाऱ्यांच्या मते, ज्यांना घरी बारचा परवाना घ्यावा लागेल त्यांच्यासाठी कमाल मर्यादा देखील निश्चित केली गेली आहे. दारूच्या 15 श्रेणींमध्ये फक्त 72 बाटल्या ठेवल्या जाऊ शकतात. उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या मते, या नियमाचा उद्देश कोणालाही त्रास देणे हा नसून काही लोकांच्या मद्य विक्रीला कायदेशीर मान्यता मिळवणे आहे. काहीजण घरी स्वतःचे खासगी बार विनापरवाना बनवत आहेत. त्यामुळं आता घरात फक्त 750 मिलीच्या दारूच्या बाटल्या ठेवल्या जाऊ शकतात. यात दोन भारतीय ब्रॅण्ड आणि दोन विदेशी ब्रँडचा समावेश असेल. ज्यांना यापेक्षा जास्त दारू घरात ठेवायची आहे, त्यांना घरी बारचा परवाना घ्यावा लागेल. हे वाचा - लग्नाला यायचंय? मग आधी 3 लाख रुपये द्या, नवरीनं पाहुण्यांसमोर अट ठेवत दिली अजब धमकी एवढेच नाही तर नवीन नियमांनुसार जे लोक दुकानातून मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या खरेदी करतात. त्यांना घरात बार परवाना दाखवण्यासही सांगितले जाऊ शकते. माहितीनुसार, जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडे होम बारसाठी विनंती केली जाऊ शकते, जी डीएमद्वारे मंजूर केली जाईल. होम बार परवान्याचे एक वर्षासाठी शुल्क 12 हजार रुपये आणि सुरक्षा ठेव (डिपॉजिट) 51 हजार रुपये आहे. हे वाचा - बेडरूममध्ये आढळलेली पतीची सिक्रेट लिस्ट पाहून हादरली पत्नी; गर्लफ्रेंड्ससोबत करायचा हे विचित्र काम होम बार परवान्यांतर्गत व्हिस्कीच्या बाटल्यांची जास्तीत जास्त संख्या 6 आणि 4 भारतीय ब्रँड, 2 आयातित आणि 1 भारतीय ब्रँड रम, 2 आयातित आणि 1 भारतीय ब्रँड वोडका, 1-1 आयात आणि भारतीय वाइन बाटल्या आहेत. ब्रँडेड बाटल्या, 12 आयात बिअर आणि 6 भारतीय ब्रँडच्या बाटल्यांना परवानगी आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत राजधानी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये कोणीही गृह परवान्यासाठी अर्ज केलेला नाही. उत्पादन शुल्क विभाग आता घरा-घरात तपासणी मोहीम राबवण्याच्या तयारीत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Uttar paredesh, Uttar pradesh news

    पुढील बातम्या