नवी दिल्ली, 17 एप्रिल: मनात जिद्द असेल तर अगदी खेडापाड्यांचा विकास होऊ शकतो, अशी उदाहरणं अनेकदा आपल्या समोर आली आहेत. या जिद्दीला शिक्षणाची जोड मिळाली तर गावाचा कायापालटही होऊ शकतो. MBA सत्यदेव गौतम जेव्हा हरयाणातील पलवल जिल्ह्यातल्या भिडूकी गावाचे सरपंच बनले ते गावाचा कायापलट करायचा या निश्चयानेच. त्यासाठी त्यांनी गावात रेनवॉटर हार्वेस्टिंग (Rain Water Harvesting) मोहिमेला सुरुवात केली. आता दर पावसाळ्यात त्यांचं गाव 25 लाख लीटर पाणी वाचवतं आहे. भिडूकी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या 'मन की बात'या (Mann Ki Baat) कार्यक्रमात कौतुक केलं आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यतिरिक्त इतर अनेक उपक्रम भिडूकी गाव राबवतंय. या गावाचा आदर्श इतर गावानींही घेण्याची गरज आहे. कशी घडली ही कमाल जाणुन घेऊयात.
पाणी हे जीवन आहे. परंतु देशात ज्या प्रकारे पाणी टंचाईचं संकट वाढत चाललं आहे. ते पाहता प्रत्येक नागरिकाने आपापल्या स्तरावर पाणी बचतीचा प्रयत्न केला पाहिजे. बऱ्याच भागात भूगर्भातील पाण्याची पातळी अत्यंत खाली गेली आहे. अशा परिस्थितीत पावसाचे पाणी आणि पाण्याचे स्रोत वाचवण्याची मोठी गरज आहे. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (Rain Water Harvesting) ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे पाणीटंचाईवर मात केली जाऊ शकते.
(हे वाचा-PHOTOS: जगभरातील देशांत निरनिराळ्या आहेत विवाह चालीरिती, जाणून घ्या खास कारणं)
देशाच्या कानाकोपऱ्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येउ शकतं. देशात सगळीकडे पावसाचं पाणी वाचलं तर, दुष्काळग्रस्त भागाबरोबरच शहरी भागालाही याचा फायदा होईल. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व लक्षात घेऊन हरियाणाच्या 'भिडूकी ग्रामपंचायतीने' एक नव्हे तर चार वेगवेगळ्या ठिकाणी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम' तयार केले आहेत. सुमारे 18 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात आता पाणीपुरवठा होत नाही किंवा पाण्याची समस्या नाही. द बेटर इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे.
ही पद्धत केवळ दुष्काळग्रस्त भागासाठीच (Drought-prone areas) नाही तर ज्या भागात पाऊस चांगला आहे तेथेच आवश्यक आहे. कारण जर देशातील कानाकोपऱ्यात पावसाचे पाणी वाचले तर प्रत्येक भागाला याचा फायदा होईल. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व लक्षात घेऊन हरियाणाच्या 'भिडूकी ग्रामपंचायतीने' एक नव्हे तर चार वेगवेगळ्या ठिकाणी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम' तयार केले आहेत. सुमारे 18 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात आता पाणीसाठा करण्याची गरज पडत नाही किंवा पिण्याच्या पाण्याची समस्या नाही.
मीडिया अहलावानुसार, काही वर्षांपूर्वी पलवल जिल्ह्यातील भिडूकी गावात पावसाळ्यात लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागायचा. गावात पाण्याचा निचरा होत नसल्याने विविध ठिकाणी पाणी साचायचं. खास करुन सरकारी शाळेच्या भागात पाणी साचायचं ज्यामुळे पावसाळ्यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
(हे वाचा-OMG! इथं चक्क वाहू लागली दुधाची नदी; भरण्यासाठी लोकांची उडाली झुंबड)
या गावातील शाळेची इमारत बरीच जुनी आहे. तिची डागडूजी करणं ग्रामपंचायतीला शक्य नव्हते. गौतम म्हणतात की पूर्वी ते गुरुग्राममधील एका कंपनीत काम करायचे. त्या भागातही पाणी साठायचं, कंपनीने रेन वॉटर हार्वेस्टिंगने तिथली समस्या सोडवली. गौतम सांगतात, 'कंपनीतली ती सिस्टीम पाहुनच मला कळालं की, आपल्या गावातल्या समस्येवर हाच उपाय आहे. पण, टेक्निकली काही गोष्टी स्पष्ट झाल्या नव्हत्या. त्यामुळे पुन्हा कंपनीत जाऊन समजुन घेतल्या आणि त्यानंतर आम्ही शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरू केलं.' शाळेचे मुख्याध्यापक हरिसिंह यांनी अशी माहिती दिली की, 'शाळा खूप जुनी आहे.एरवी पेक्षा पावसाळ्यात अडचण वाढते. पावसाळ्यात संपूर्ण शाळा भरायची पण, आता तसं होत नाही. या सिस्टमने बरीचशी अडचण दुर झालीये. ही ग्रामपंचायत गावच्या समस्यांच्या बाबतीत खुप सक्रीय आहे.'
पाणी साठण्याची समस्या संपली
मीडिया अहलावानुसार, सुरवातीला शाळेच्या छतावरचं पाणी गोळा करण्यासाठी पाईप्स जमा करण्यात आले. त्यानंतर, रस्ता आणि शाळा इतर उर्वरित पाणथळ जागा नाल्याद्वारे एकमेकांना जोडल्या गेल्या. शाळेच्या एका भागात सुमारे 8 फूट रुंद आणि 10 फूट लांब 3 भूमिगत टाक्या तयार केल्या. या तीन टाक्या एकमेकांशी जोडलेल्या. पहिल्या 2 टाक्यांमध्ये पावसाचं पाणी फिल्टर केलं जातं. तिसऱ्या टाकीत 120 मीटर खोल बोअरवेल बांधला गेला आहे. या बोअरवेलद्वारे संगळं पाणी जमिनीत सोडलं जातं.
शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बसवल्यानंतर पाणी साचण्याची समस्या पूर्णपणे संपली. गौतम सांगतात की, या प्रणालीने वर्षभरात 11 लाख लीटरपेक्षा जास्त पावसाचं पाणी साठवलं जातंय. त्यामुळे गावाल्या इतर भागातही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं गेलं. त्यांनी अशी माहिती दिली की, 'गावातल्याच 40 घरांच्या वाल्मिकी वस्तीतील रहिवाशांनी ग्रामपंचायतीकडे आपली समस्या मांडली, पावसामुळे त्यांच्या घरासमोर पाणी भरते. येण्याजाण्यास खूप त्रास होतो असं सांगितलं. म्हणूनच, तिथेही रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बांधली.'
आता गावातील उप-आरोग्य केंद्र आणि क्रीडा संकुलातही रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम बांधण्यात आले आहेत. तसंच, प्रत्येक यंत्रणेत फिल्टर बसवण्यात आले आहेत जेणेकरून पाणी झिरपण्यात अडचण येऊ नये. यामुळे क्षारयुक्त पाण्याची अडचण संपुन गोडं पाणी मिळतंय. या 4 रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टममुळे भिडूकी गाव दरवर्षी सुमारे 25 लाख लीटर पावसाचं पाणी वाचून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यास हातभार लावतोय.
जलस्त्रोतांची संख्या वाढली
या मीडिया अहलावानुसार, सुरुवातील ग्रामपंचायतीने गावातील पाण्याचे स्त्रोत वाढवण्यावर भर दिला. त्यासाठी जंलसंधारणासाठी दिलेली जमीन अतिक्रमणामधुन सोडवली. सफाई करुन तलाव खोदला. पावसाळ्यात हा तलाव पाण्याने भरलेला असतो आणि ग्रामस्थांना फायदा होतो. आता गावातील सिंचनक्षेत्र वाढलं आहे. गौतम सांगतात, 'गावातील शेतात, सुमारे दर 2 किलोमीटर अंतरावर दर 200 ते 300 मीटर अंतरावर 6 फूट रुंदीचे आणि 10 फूट लांबीचे खड्डे तयार केले गेलेत. मेन लाईन खड्ड्यांशी जोडलेली आहे. जेव्हा शेतकऱ्यांना पाण्याची गरज भासते तेव्हा त्यांना इथुन पाणी घेता येते.'
(हे वाचा-कोरोनाचा ताण दूर करा! 'या' देशात पर्यटकांचं लसीकरण, सरकारकडून नवी योजना)
तसं भिडूकी गावात शेतीसाठी कॅनलचं पाणीही आहे. हे पाणी मिळायला उशीर झाला तरी, शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रतीक्षा करावी लागत नाही. गौतम म्हणतात, 'रेन वॉटर हार्वेस्टिंंगने शहर आणि गावातील पाण्याची समस्या सोडवली जाऊ शकते. पाणी साठवण हा पाणी बचतीचा एक प्रभावी मार्ग आहे. पण,ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवायची गरज आहे.' गौतम सांगतात, "रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टमने आमच्या गावाची भविष्यातली पाणी समस्या सोडवली आहे'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM narendra modi