कोरोनाचा ताण दूर करा! 'या' देशात पर्यटकांचं लसीकरण, सरकारकडून नवी योजना

कोरोनाचा ताण दूर करा! 'या' देशात पर्यटकांचं लसीकरण, सरकारकडून नवी योजना

सतत कोरोनाच्या नकारात्मक बातम्या पाहून, वाचून नागरिकांमध्ये टेंशन वाढत आहे. अशात पर्यटन हा यात चांगला उपाय ठरू शकतो. यासाठी या देशात लसीकरण स्कीम सुरू करण्यात येत आहे.

  • Share this:

कोरोना व्हायरसच्या कहरात जगभरात मालदीव असा एक देश होता, जिथे पर्यटकांसाठी दारं खुली करण्यात आली. पर्यटनावर आपली अर्थव्यवस्था अवलंबून असल्या कारणाने आता हा देश वॅक्सीन टूरिजमला प्रमोट करीत असल्याचं दिसत आहे. त्यांच्या नव्या योजनेनुसार या देशात पर्यटनासाठी आलेल्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना येथे पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.

या देशाचे पर्यटन मंत्री डॉ अब्दुल्ला मौसूम यांनी सांगितलं की, मालदीव '3 री टूरिज्म' स्कीम तयार करीत आहे. याअंतर्गत पर्यटकांना 'विजिट, वॅक्सीनेट आणि वेकेशन' (या लसीकरण करा आणि सुट्ट्यांचा आनंद घ्या) ही सुविधा मिळेल.

मिळालेल्या माहितीनुसार या देशात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना लसीकरणाने दोन डोज दिले जातील. म्हणजेच या स्कीमअंतर्गत येणाऱ्या पर्यटकांना मालदीवमध्ये काही आठवडे राहावे लागेल. त्यांना विश्वास आहे की यामुळे पुन्हा एकदा पर्यटनाला बुस्ट मिळेल. मालदीवमध्ये दरवर्षी 17 लाख लोक पर्यटनासाठी येतात.

हे ही वाचा-चाचणी न करता Covid निगेटिव्ह; गुजरातमध्ये महाराष्ट्रातील रॅकेटचा पर्दाफाश

मालदीवचा 'वॅक्सीनेशन पॅकेज' घेण्यासाठी इच्छुक पर्यटकांना सध्या काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.  '3ऱ्या' स्कीमची सुरुवात मालदीवमधील 5.5 लाख नागरिकांच्या लसीकरणानंतर केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्र्यांनी सांगितलं की, पर्यटन सेक्टर सुरू करण्यामागे पर्यटकांसाठी सुरक्षित प्रवास आणि त्यांना पर्यटनाचा आनंद घेता यावा हा आहे. एकदा देशातील नागरिकांचं लसीकरण झाल्यानंतर नवी योजना सुरू करण्यात येईल.

मौसूम यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 53 टक्के लोकसंख्येला लसीकरणाची पहिली मात्रा देण्यात आली आहे. ज्यात 90 टक्के पर्यटन क्षेत्रातील कामगार आहेत. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या डेटानुसार मालदीवच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचं योगदान 28 टक्के आहे. हे जगातील कोणत्याही देशांपेक्षा अधिक आहे.

फेब्रुवारी महिन्यात मालदीव मार्केटिंग अँड पीआर कॉर्पोरेशनचे प्रबंध निर्देशक थॉयीब मोहमे यांनी सीएनएन ट्रॅव्हल्सला सांगितलं की, देशात 2020 मध्ये 5,55,494 पर्यटक फिरण्यासाठी आले जे 5,00,000 च्या अपेक्षित संख्येपेक्षा अधिक होते.

Published by: Meenal Gangurde
First published: April 17, 2021, 3:12 PM IST

ताज्या बातम्या