ब्रिटन, 17 एप्रिल : दुधाची नदी (****Milk river) असती तर… कल्पनात्मक निबंध लिहिण्यासाठी किंवा स्वप्नात पाहण्यासाठी ठिक आहे. पण प्रत्यक्षात कधी अशी दुधाची नदी (Milk in river) वाहताना पाहिली आहे का? सध्या अशाच दुधाच्या नदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होतो आहे. दुधाची नदी पाहतातच दूध भरण्यासाठी भांडी घेऊन ते भरण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही दुधाची नदी नेमकी आहे तरी कुठे? तर ही नदी आहे यूकेमध्ये (UK). यूकेमध्ये अचानकपणे ही दुधाची नदी पाहू (Milk river in UK) लागली. नदीचं पारदर्शक पाणी दुधासारखं पांढरशुभ्र झालं आणि सर्वजण हैराण झाले. आता खरंच ही दुधाची नदी आहे? नदीचं पाणी असं पांढरं का? असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील.
व्हेल्समध्ये वाहणारी ही दुलाइस नदी (river Dulais) आहे. या नदीचं पारदर्शक पाणी अचानक पांढरं झालं आणि याचं कारण दूधच. होय. नदीत दूधच आहे. पण ही संपूर्ण दुधाची नदी नाही. हे वाचा - पैशांसाठी विषारी सापांनी भरलेल्या टबमध्ये बसला आणि…; पाहून अंगावर येईल काटा ही सामान्य पाण्याचीच नदी आहे. पण या पाण्यात दुधाचा टँकर पलटी झाला. ज्यामुळे टँकरमधील दूध पाण्यात मिसळलं आणि नदीचा पारदर्शक पाण्याचा रंग दुधासारखा पांढरा झाला आणि संपूर्ण नदीतून हे दूध वाहू लागली आणि पाहणाऱ्याला तर चक्क ही दुधाचीच नदी आहे, असंच वाटू लागलं. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हे वाचा - OMG! बोटीतून समुद्रात पडला तो थेट Whale च्या जबड्याजवळ; पुढे काय घडलं पाहा VIDEO सुरुवातीला नदीचा रंग बदलल्यामुळे लोक थोडे हैराण झाले पण जेव्हा पाण्यात दूध असल्याचं समजलं तेव्हा लोकं आपल्या घरातील भांडी घेऊन हे दूध भरण्यासाठी धावून आले. लोकांची एकच झुंबड उडाली. दरम्यान या दुधाच्या गुणवत्तेबाबत मात्र शंका उपस्थित केली जाते आहे.