मराठी बातम्या /बातम्या /देश /

प्रशांत किशोर यांच्या बंगळुरूतल्या भेटींमुळे राजकीय चर्चा; दक्षिणेत कुणासाठी करतायत मोर्चेबांधणी

प्रशांत किशोर यांच्या बंगळुरूतल्या भेटींमुळे राजकीय चर्चा; दक्षिणेत कुणासाठी करतायत मोर्चेबांधणी

राजकीय रणनीतिकार (Political strategist) म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नुकतीच कर्नाटकमधल्या (karnataka) काही कॉंग्रेस नेत्यांची (Congress Leaders) भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

राजकीय रणनीतिकार (Political strategist) म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नुकतीच कर्नाटकमधल्या (karnataka) काही कॉंग्रेस नेत्यांची (Congress Leaders) भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

राजकीय रणनीतिकार (Political strategist) म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नुकतीच कर्नाटकमधल्या (karnataka) काही कॉंग्रेस नेत्यांची (Congress Leaders) भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

शरद शर्मा कलागारू

बंगळुरू, 26 नोव्हेंबर: राजकीय रणनीतिकार (Political strategist) म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नुकतीच कर्नाटकमधल्या (karnataka) काही कॉंग्रेस नेत्यांची (Congress Leaders) भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. प्रशांत किशोर तृणमूल कॉंग्रेससाठी (Trinmool Congress) रणनीती आखण्याचं काम करत असून, पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखून तृणमूलला विजय मिळवून देण्यात त्यांच्या रणनीतीचा मोठा सहभाग आहे. आता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचं अस्तित्व पश्चिम बंगालव्यतिरिक्त अन्य राज्यांमध्येही निर्माण करण्याकरिता त्यांचे प्रयत्न सुरू असून, त्याचाच हा एक भाग असल्याचं मानलं जात आहे. कर्नाटकातल्या काँग्रेस नेत्यांना तृणमूल कॉंग्रेसमध्ये सामील करण्यासाठी प्रशांत किशोर प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू आहे.

काँग्रेस नेत्याशी संपर्क

भारतीय राजकीय कृती समितीचे (I-PAC) संस्थापक सदस्य असलेल्या प्रशांत किशोर यांनी गोवा, उत्तर प्रदेश आणि मेघालयमधल्या निवडणूक प्रचाराची आखणी केल्यानंतर, आता दक्षिणेकडे आपला मोहरा वळवला आहे. गुरुवारी (25 नोव्हेंबर) प्रशांत किशोर यांनी बेंगळुरूमध्ये (Bengaluru) काँग्रेसमधल्या लिंगायत समाजाच्या एका वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधून त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ही भेट होऊ शकली नसल्याचं कर्नाटक काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितलं.

भाजपमध्ये कोणते बदल होणार का? अमित शहांच्या भेटीनंतर फडणवीसांचं मोठं विधान

किशोर यांच्याकडे भेटण्याची इच्छा असलेल्या नेत्यांची यादी आहे आणि गुरुवारची भेट ही काँग्रेस नेत्यांची 'शिकार' करण्याचा पहिला प्रयत्न होता. पक्षातल्या वरिष्ठ नेत्याची भेट झाली नसली, तरी किशोर यांनी दुसऱ्या फळीतल्या अनेक नेत्यांची आणि काही विद्यमान खासदारांची भेट घेतली. येत्या काही दिवसांत ते आणखी नेत्यांशी संपर्क साधण्याची शक्यता असल्याचं काँग्रेसच्या एका उच्चपदस्थ सूत्राने सांगितलं.

एम बी पाटील कोण?

नाव न सांगण्याच्या अटीवर News18 शी बोलताना एका काँग्रेस नेत्यानं सांगितलं, की 'पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) सामील होणार का हे विचारण्यासाठी प्रशांत किशोर एम. बी. पाटील यांना भेटायला आले आहेत; मात्र पाटील यांनी त्यांची भेट घेतली नाही. फोनवर त्या दोघांचे बोलणं झालं असून, एम. बी. पाटील यांनी कर्नाटकात टीएमसीचं नेतृत्व करावं, अशी प्रशांत किशोर यांची इच्छा आहे. एम. बी. पाटील यांना लिंगायत समाजाचा भक्कम पाठिंबा आहे हे सर्वांना माहीत आहे; पण एम.बी. पाटील हे पक्षाचे निष्ठावंत आहेत. त्यामुळे त्यांनी ही ऑफर नाकारली असल्याचं मला सांगण्यात आलं आहे.'

मार्च महिन्यात राज्यातील आघाडी सरकार कोसळणार अन् भाजपचं सरकार येणार: नारायण राणे

काँग्रेसमधल्या सध्याच्या राजकीय समीकरणांबाबत बोलताना आणखी एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, की 'पाटील या परिस्थितीचा उपयोग करू शकतात. एम. बी. पाटील, डी. के. शिवकुमार, सतीश जारकीहोळी आणि डॉ. जी. परमेश्वरा हे सिद्धरामय्या यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. सिद्धरामय्या बाहेर गेले, तर ते एम. बी. पाटील आणि सतीश जारकीहोळी यांना नक्कीच पाठिंबा देतील. डी. के. शिवकुमार यांना हटवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.'

'या सगळ्या परिस्थितीत एम. बी. पाटील किशोर यांची गुप्त रीतीने भेट घेऊ शकतात आणि त्यांचे पर्याय खुले ठेवू शकतात,' असंही या नेत्यानं नमूद केलं. 'बी.एस येडियुरप्पा हे एकमेव नेते आहेत ज्यांची लिंगायत समाजावर पूर्ण पकड आहे; पण एम. बी. पाटील यांच्याकडेही लिंगायत समाजाला आपल्य्याकडे वळवण्याची ताकद आहे. कॉंग्रेसने त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली तर हे शक्य आहे,' असंही या नेत्यानं स्पष्ट केलं.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एका राजकीय निरीक्षकाने सांगितलं, की येडियुरप्पा (Yediurappa) मुख्यमंत्रिपदावरून (chief Minister) पायउतार झाल्यानंतर लिंगायत समाजालाही (Lingayat community) धक्का बसला होता. आता त्यांचा नेता मुख्यमंत्री होणार नाही हे या समाजाला माहीत होतं; पण पाटील यांनी आपले पत्ते बरोबर खेळले तर ते सिद्धरामय्या आणि उत्तर कर्नाटकातल्या लिंगायत नेत्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर डी. के. शिवकुमार यांना हटवण्यासाठी पक्षाच्या हायकमांडवर दबाव आणू शकतात.

मुंबईतील कार्यक्रम रद्द करुन शरद पवार दिल्लीत, चंद्रकांत पाटील-फडणवीसही दिल्लीत

'एम. बी. पाटील आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली, तर काँग्रेस त्यांना नक्कीच रोखण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे पाटील निवडणुकीपूर्वी कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाची मागणी करू शकतात. पाटील आणि काँग्रेस दोघांसाठीही हा फायद्याचा सौदा ठरेल; मात्र याचा डी. के. शिवकुमार यांना फटका बसेल आणि अंतर्गत युद्धाला आणखी एक निमित्त मिळेल,' असं भाकीत एका काँग्रेस नेत्याने वर्तवलं.

काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न?

काँग्रेसमधून किमान पाच मोठे नेते फोडण्याचा प्रशांत किशोर यांचा प्रयत्न असून, फार सक्रिय नसलेल्या आणखी नेत्यांची निवड करण्यावरही त्यांचा भर आहे. ते तटस्थ राहणाऱ्या नेत्यांची यादी तयार करत असल्याचीही चर्चा आहे, असं सूत्रांनी म्हटलं आहे.

आज आपण संविधानाचं एक पानही लिहू शकलो असतो का?: पंतप्रधान

विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील आणि ज्येष्ठ नेते प्रतापचंद्र शेट्टी यांसारख्या काँग्रेसच्या काही बड्या तोफांना विधान परिषदेच्या निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही; पण राजकीय पार्श्वभूमी नसलेले युसूफ शरीफ ऊर्फ स्क्रप बाबू यांच्यासारखे नवीन सदस्य तिकीट मिळवण्यात यशस्वी झाले. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष शिवकुमार यांच्याशी अनेकांचे मतभेद आहेत, तर काही जणांना सिद्धरामय्या नको आहेत. या सगळ्या बाबींचा वापर करून किशोर यांना काही प्रमुख नेत्यांना तृणमूलमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. तृणमूल कॉंग्रेस 2023च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Elections) रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांनी आधीच उत्तर, ईशान्य आणि पश्चिमेकडच्या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने अन्य पक्षातल्या नेत्यांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलं असून, उत्तर प्रदेश, मेघालय, त्रिपुरा आणि गोव्यात पक्ष राजकीय मैदानात उतरला आहे. आता त्यांनी कर्नाटककडे मोहरा वळवल्यानं इथली राजकीय समीकरणं कशी बदलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

First published:

Tags: Bangaluru, Karnataka, Prashant kishor, TMC