नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: संविधान दिनाच्या (Constitution Day) निमित्तानं संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये (Central Hall of Parliament) एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) कार्यक्रमाला संबोधित केलं. यावेळी मोदी म्हणाले की, आज जर संविधानाची निर्मिती करावी लागली असती तर आपण संविधानाचं एक पानही लिहू शकलो असतो का? ही शंका आहे.
स्वातंत्र्याच्या आंदोलनाची छाया, देशभक्तीची आग आणि फाळणीचं दु:ख या पार्श्वभूमीवर देशात संविधानाची निर्मिती झाली, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
आजचा दिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या पवित्र जागेवर काही लोकांनी भारताच्या कुशल भविष्यासाठी मंथन केलं होतं.
आजच्या दिवशी 2008 साली मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानं देश हादरुन गेला होता.
Addressing the programme to mark Constitution Day in Central Hall. https://t.co/xmMbNn6zPV
— Narendra Modi (@narendramodi) November 26, 2021
आपल्या सैन्यानं दहशतवाद्यांशी निकराचा लढा दिला होता. यात जवानांसह काही नागरिकांनी बलिदान दिलं होतं. या सर्व वीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस आहे.
आज आपल्याला संविधानाची निर्मिती करावी लागली असती तर काय झालं असतं?
स्वातंत्र्याच्या आंदोलनाची छाया, देशभक्तीची आग, फाळणीचं दु:ख हे सर्व असूनही त्यावेळी देशहित सर्वोच्च हाच सर्वांच्या मनात मंत्र होता.
हेही वाचा- रत्नागिरी: मच्छिमार बोटीसह 6 खलाशी अद्याप बेपत्ता; एक महिना उलटूनही तपास जैसे थे
विविधतेने नटलेला देश, अनेक भाषा, पंथ आणि राजेरजवाडे हे सर्व असूनही संविधानाच्या माध्यमातून सर्व देशाला एका बंधनात बांधण्याची योजना बनवणे कठीण होतं. आजच्या संदर्भात त्याकडे पाहिलं तर संविधानाचं एक पानही आपण लिहू शकलो असतो का?
President Ram Nath Kovind leads the nation in reading the Preamble to the Constitution of India#ConstitutionDay2021 pic.twitter.com/XPnK9G8Pfz
— ANI (@ANI) November 26, 2021
राजकीय पक्षातील घराणेशाही लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे.
एका पक्षाची सूत्रं पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याच्या हातात राहणं लोकशाहीच्या विरोधात आहे.
ज्यांनी लोकशाही मूल्य गमावलं आहे ते लोकशाहीचं संरक्षण कसं करु शकतील?, मोदींचा सवाल
हेही वाचा- 'पोपट शोधा आणि मिळवा 15 हजार', इंजिनिअरची जाहिरात; घरोघरी वाटली पत्रकं
भारत एका अशा संकटाकडे जात आहे जो संविधानाशी समर्पित असलेल्या लोकांसाठी चिंतेचा विषय आहे.
आपल्या चांगल्या गुणांच्या आधारे एका परिवारातून अनेक लोकं राजकारणात येत असतील तर ती घराणेशाही नसते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM narendra modi