मराठी बातम्या /बातम्या /देश /भाजपमध्ये कोणते बदल होणार का? अमित शहांच्या भेटीनंतर फडणवीसांचं मोठं विधान

भाजपमध्ये कोणते बदल होणार का? अमित शहांच्या भेटीनंतर फडणवीसांचं मोठं विधान

'राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्याची मला कल्पना नाही. मी आणि चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी इथं आलो होतो.

'राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्याची मला कल्पना नाही. मी आणि चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी इथं आलो होतो.

'राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्याची मला कल्पना नाही. मी आणि चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी इथं आलो होतो.

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या (mlc election 2021) निमित्ताने भाजपमध्ये हालचालींना वेग आला आहे. अशातच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यातील भाजपच्या संघटनेमध्ये कोणतेही बदल होणार नाही, अशी माहिती खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आज दुपारी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अंतर्गत बऱ्यात घडामोडी घडल्यात. त्यामुळे या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

IPO निवडताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, होणार नाही नुकसान

अमित शहा हे आमचे नेते आहे. त्यामुळे दिल्लीत आल्यावर आम्ही त्यांची भेट घेतच असतो. त्यामुळे कुठलाही संघटनेमध्ये बदल नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

'राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्याची मला कल्पना नाही. मी आणि चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच्या संघटनात्मक बैठकीसाठी इथं आलो होतो. संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी ही बैठक झाली', असं फडणवीस यांनी सांगितलं.

तसंच, 'नागपूरमध्ये कुठला चमत्कार घडवतील असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. पण, असं काहीही तिथे घडणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे हे चांगल्या मतांनी निवडून येतील', असं म्हणत फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगावला.

IND vs NZ : दुसरा दिवस न्यूझीलंडच्या नावावर, सलामीवीरांची अभेद्य भागीदारी

विशेष म्हणजे,  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. "चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना भाजपच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली. त्यांचे मार्गदर्शन घेतले. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्त्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना माहिती दिली. राज्यातील सद्यस्थितीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली", अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. पण या भेटीमागे अनेक कारणं असल्याच्या शक्यता आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या तयारीबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यानंतर आज फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि अमित शहा यांची बैठक पार पडली.

First published: