PM पुन्हा मुख्यमंत्र्यांशी बोलणार; 11 तारखेला होणार मोठा निर्णय

PM पुन्हा मुख्यमंत्र्यांशी बोलणार; 11 तारखेला होणार मोठा निर्णय

21 दिवसांचा लॉकडाऊनचा काळ संपत आला असताना 11 एप्रिलला पुन्हा एकदा पंतप्रधान राज्यांच्या परिस्थितीचा अंदाज घेणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Coronavirus च्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर एक बैठक घेतली होती. देशव्यापी लॉकडाउन सुरू व्हायच्या आधीही अशी बैठक झाली होती त्यानंतरही एकदा ती झाली आता 21 दिवसांचा लॉकडाऊनचा काळ संपत आला असताना 11 एप्रिलला पुन्हा एकदा पंतप्रधान राज्यांच्या परिस्थितीचा अंदाज घेणार आहेत. त्यांनी मागच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना कोरोनाशी लढा कसा द्यायचा, लॉकडाऊननंतर काय करायचं याविषयी सूचना देण्यास सांगितलं होतं. आता 11 एप्रिलची बैठक मुख्यतः लॉकडाऊनसंदर्भातच असेल, असा अंदाज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Covid-19 मुले उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बुधवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यात 21 दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले. लॉकडाऊननंतरही देशातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. तो कमी होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे या परिस्थितीत लॉकडाऊन सरसकट उठवणं परवडण्यासारखं नाही, असं पंतप्रधान म्हणाले. आता हीच चर्चा ते मुख्यमंत्र्यांबरोबर करतील आणि त्यानंतरच लॉकडाऊनचा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.

वाचा - सर्वपक्षीय बैठकीत शरद पवारांनी दिला मोदींना सल्ला, केल्या 10 मोठ्या मागण्या

कोरोनाव्हायरसच्या (Covid -19) प्रकरणात वाढ होत असताना सर्व भागांतून 14 एप्रिल रोजी लॉकडाऊन उठवणे शक्य होणार नाही. सर्व पक्षांच्या नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ते राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करतील पण लॉकडाऊन लवकरच संपेल अशी शक्यता दिसत नाही.

"कोविड - 19 नंतर पुन्हा आयुष्य पूर्वीसारखे नसेल", असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. "यापुढे आयुष्यात ‘कोरोनापूर्वी आणि कोरोनानंतर’ हे स्वरुप असेल."

पाहा VIDEO : कोरोनाशी लढणाऱ्या नर्स आणि तिच्या मुलीचे अश्रू पाहून डोळ्यात येईल पाणी

पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये राजकीय नेत्यांना सांगितले की, ‘यापुढे मोठ्या प्रमाणात वर्तणूक, सामाजिक आणि वैयक्तिक बदल घडवून आणायला हवेत.’ कोरोनाव्हायरसविरूद्धच्या लढ्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. सध्या देशात कोविड – 19 रुग्णांची संख्या 5,194 वर पोहोचली आहे. या बैठकीत आरोग्य सचिव, गृहसचिव यांनी सद्याची कोरोना व्हायरसची परिस्थिती सविस्तरपणे सांगितली. यापूर्वी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्याचं आवाहन केलं आहे. सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊनची मर्यादा वाढविण्याचं आवाहन केलं जात आहे.

अन्य बातम्या

आकाशात दिसला सर्वांत मोठा चंद्र; Super Pink Moon चे पाहा जगभरातले फोटो

लॉकडाउनमुळे 2.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता, या क्षेत्राला मोठा फटका

First published: April 8, 2020, 4:52 PM IST

ताज्या बातम्या