मराठी बातम्या /बातम्या /मनी /

लॉकडाउनमुळे 2.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता, या क्षेत्राला सर्वात मोठा फटका

लॉकडाउनमुळे 2.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता, या क्षेत्राला सर्वात मोठा फटका

Mumbai: Passenger wearing mask amid coronavirus outbreak is seen at International Airport in Mumbai, Friday, March 20, 2020. (PTI Photo)(PTI20-03-2020_000256B)

Mumbai: Passenger wearing mask amid coronavirus outbreak is seen at International Airport in Mumbai, Friday, March 20, 2020. (PTI Photo)(PTI20-03-2020_000256B)

ट्रॅव्हल, टुरिझम आणि एव्हिएशन या क्षेत्रामध्ये जवळपास 6.2 कोटी लोकांना रोजगार मिळतो. आता यामधील 2.5 कोटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या संकटात आहेत.

    नवी दिल्ली, 08 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus)मुळे हाहाकार माजला आहे. अनेकांच्या नोकऱ्या या व्हायरसच्या संक्रमणामुळे धोक्यात आल्या आहे. कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसला तो ट्रॅव्हल, टूरिझम आणि विमानसेवा व्यवसायाला. या क्षेत्रातील लोकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे तर काहींनी नोकऱ्या गमावल्या आहेत. या क्षेत्रामध्ये जवळपास 6.2 कोटी लोकांना रोजगार मिळतो. आता यामधील 2.5 कोटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या संकटात आहेत. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्टने असोसिएशनने (IATA) जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. लॉकडाउनमुळे विमानप्रवासाच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याती माहिती या अहवालात नमूद करण्यात आली आहे. (हे वाचा-3 महिन्यांचा EMI थांबवण्यासाठी मागितला जातोय OTP, पोलिसांचं 'अलर्ट' राहण्याचं आवाहन) जगभरात सुरू असणाऱ्या लॉकडाउनमुळे एव्हिएशन इंडस्ट्रीमधील पँसेंजर रेवेन्यू 2019 पेक्षा यावर्षी 44 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या व्यवसायाला 252 बिलियन डॉलरचा तोटा यावर्षात सहन करावा लागू शकतो. एप्रिल ते जून या कालावधीमध्ये विमान प्रवासाची मागणी 70 टक्क्यांनी घसरू शकते. लॉकडाउनमुळे कोट्यवधींचं नुकसान होणाऱ्या विमान कंपन्यांनी सरकारकडून मदतीची अपेक्षा केली आहे. या 21 दिवसांच्या लॉकडाउनच्या काळात एव्हिएशन इंडस्ट्रीली 75 ते 80 हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. दिवसागणिक हे नुकसान 150 कोटी इतकं आहे. तर जगभरात सुमारे 21 लाख कोटींच्या नुकसानाची शक्यता आहे. एशिया पॅसिफिक एव्हिएशन इंडिया (CAPA)च्या अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली आहे. (हे वाचा-कोरोनामुळे 'या' क्षेत्रातील 80,000 लोकांच्या नोकरीवर गदा, सर्व्हेतून माहिती समोर) CAPA च्या अहवालानुसार या एप्रिल ते जूनमध्ये झालेल्या नुकसानामुळे जूनअखेपासून सुद्धा एअरलाइन कंपन्या त्यांची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाण पूर्ण ताकदीने सुरू करू शकणार नाहीत. याचा परिणाम 2021 च्या विमान कंपन्यांचे तिकीट दर आणि उद्योगाशी संबधित इतर बाबींवर होणार आहे. काही एअरलाइन्स बंद होण्याची भीती दरम्यान लॉकडाउनचा कालावधी वाढला तर एअरलाइन्सचं आणखी नुकसान होईल, असं CAPAच्या अहवालात सांगण्यात आले आहे. जर लॉकडाउन तीन महिन्यांपर्यंत वाढला तर, तर आर्थिक वर्ष 2020च्या शेवटच्या 3 महिन्यात आणि आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या 3 महिन्यात इंडिगो आणि स्पाइसजेट या एअरलाइन्सचं नुकसान जवळपास 1.25 ते 1.50 बिलियन डॉलर असेल. अशा परिस्थितीत छोट्या एअरलाइन्सकडे सध्या उपलब्ध असणाऱ्या ठेवी संपून जाऊन एअरलाइन्स बंद पडण्याचा धोका आहे. लॉकडाउनमुळे कोसळली अर्थव्यवस्था लॉकडाउनमध्ये कोरोनाला रोखण्याच काही प्रमाणात भारताला यश आले असले तरी, भारताची अर्थव्यवस्था मात्र संकटात आहे. वित्त मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, सद्यपरिस्थितीत असे दिसून येते की भारताचा दररोजचा GDP सुमारे 6 अब्ज डॉलर्स आहे. 30 दिवस लॉकडाऊन झाल्यास देशाला सुमारे 250 अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल. जर लॉकडाउन उठविला गेला तर 2020-21 या आर्थिक वर्षात ही हानी भरून काढली जाऊ शकते. परंतु लॉकडाउन दीर्घकाळ राहिल्यास भारतासाठी परिस्थिती बिकट होईल. संपादन-जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या