एप्रिलमध्ये येणाऱ्या पौर्णिमेला इंग्रजीत पिंक मून म्हणतात. म्हणून काल दिसलेला हा चंद्र Pink Supermoon ठरला.
भारतीय वेळेनुसार 7 एप्रिलला 8 वाजून 5 मिनिटांनी चंद्राचं हे रूप दिसायला सुरुवात झाली. 8 एप्रिललासुद्धा रात्री सुपरमून पाहता येईल.
सुपरमून 7 एप्रिलला मध्यरात्रीपूर्वी पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आला होता. त्यामुळे तो प्रखर तेजोमय दिसत होता.