Home /News /national /

Independence Day: आज 75 वा स्वातंत्र्यदिन; लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार पंतप्रधान

Independence Day: आज 75 वा स्वातंत्र्यदिन; लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार पंतप्रधान

भारत आज 75 वा स्वातंत्र्यदिन (75 th Independence Day) साजरा करत आहे. काहीच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करतील (PM Narendra Modi To Address Nation From Red Fort).

    नवी दिल्ली 15 ऑगस्ट : भारत आज 75 वा स्वातंत्र्यदिन (75 th Independence Day) साजरा करत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील अनेक भागांत कडक सुरक्षा व्यवस्था केली गेली आहे. जम्मू काश्मीरपासून (Jammu Kashmir) केरळपर्यंत (Kerala) सतर्कता बाळगली जात आहे. काहीच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करतील (PM Narendra Modi To Address Nation From Red Fort). केंद्रानं 75 वा स्वातंत्र्यदिन ‘आजादी के अमृत महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात गुजरातच्या साबरमती आश्रमातून 12 मार्चला झाली आहे. याच दिवशी महात्मा गांधींनी 1930 साली दांडी यात्रा सुरू केली होती. 12 मार्च 2021 ला सुरू झालेलं हे अभियान 12 ऑगस्ट 2023 पर्यंत चालेल. स्वातंत्र्यदिनी सुरक्षेबाबत गुप्तचरांच्या सतर्कतेनंतर लाल किल्ल्यावर सुरक्षा कडक आहे. शनिवारी सुरक्षा दलांनी जम्मू -काश्मीरमधून चार दहशतवाद्यांना अटक केली. त्यांचा हेतू 15 ऑगस्ट रोजी देशात मोठी दुर्घटना घडवण्याचा होता. VIDEO : 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला बंदोबस्तादरम्यान पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न यावेळी या कार्यक्रमात ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय तुकडीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमंत्रित केले आहे. समारंभात कोरोना नियम पूर्णपणे पाळले जातील. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीला बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागले. ध्वजारोहणानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्राला संबोधित करतील. लाल किल्ल्याच्या आसपास सर्वत्र सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत विमान उडवण्यावर बंदी असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेसात वाजता लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून आठव्या वेळी ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर राष्ट्राला संबोधित करतील. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणासाठी लोकांकडून समस्या आणि सूचना मागवल्या होत्या. पंतप्रधान गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाषणासाठी सूचना मागत आले आहेत. मोठी बातमी! रामजन्मभूमीवर हल्ल्याचा 'जैश'चा डाव उधळला; 4 अतिरेकी अटकेत राजधानी दिल्लीच्या सीमावर्ती राज्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समन्वयाने सीमा भागात सुरक्षादेखील कडक केली जात आहे. कारण हजारो शेतकरी केंद्राचे तीन नवीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून आहेत. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन 'किसान मजूर आझादी संग्राम दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Independence day, PM narendra modi

    पुढील बातम्या