मराठी बातम्या /बातम्या /देश /मोठी बातमी! रामजन्मभूमीवर हल्ल्याचा 'जैश'चा डाव उधळला; 4 अतिरेकी अटकेत

मोठी बातमी! रामजन्मभूमीवर हल्ल्याचा 'जैश'चा डाव उधळला; 4 अतिरेकी अटकेत

पाकिस्तानी अतिरेक्यांची चाल वेळीच लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. स्वातंत्र्यदिनापूर्वीच राम मंदिरावर होणार होता हल्ला, पानिपतची रिफायनरीही होती टारगेट...

  श्रीनगर, 14 ऑगस्ट: जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक मोठा दहशतवादी कट उधळला. पाकिस्तानी अतिरेक्यांची चाल वेळीच लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा  (JeM) अयोध्येच्या रामजन्मभूमीवर हल्ल्याचा डाव होता. तसंच पानिपतची मोठी रिफायनरी उडवून द्यायचाही त्यांचा कट होता.

  जम्मू काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानी दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या चौघा अतिरेक्यांना जम्मूतून ताब्यात घेतलं.  सध्या पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या अतिरेक्यांचा पाकिस्तानच्या मदतीने फार मोठा कट असल्याचं उघड झालं आहे. स्वातंत्र्यदिनापूर्वीच पानिपत इथल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा तेल शुद्धिकरण कारखाना उडवून द्यायचा आणि अयोध्येवर हल्ला करायचा या अतिरेक्यांचा डाव होता.

  जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "'जैश'चे अतिरेकी गेले 20-25 दिवस हा कट शिजवत होते.  पाकिस्तानात असलेला जैशचा कमांडर शाहीद उर्फ मुनझिर हा या कटाचा सूत्रधार आहे. या शाहीदने या मोठ्या कटासाठी अनेक तरुणांची जमवाजमव केली होती. त्यातले मुख्य चौघे आता आमच्या ताब्यात आहेत."

  या कटाचा एक भाग म्हणून जैशने इजाह खान नावाच्या उत्तर प्रदेशातल्या एका तरुणालाही फूस लावत जाळ्यात ओढलं होतं. त्याच्यावर अयोध्येच्या रामजन्मभूमीच्या हल्ल्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, असंही पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे. पोलिसांच्या दक्षतेमुळे एक मोठा हल्ला उधळला गेला आहे.

  First published:

  Tags: Jammu and kashmir, Pakistan, Terror acttack