नवी दिल्ली, 30 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 100 वर्षांच्या होत्या. हिराबेन मोदी यांच्यावर काही दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपल्या आईचं निधन झाल्याची माहिती दिली. बुधवारी हिराबेन मोदी यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना अहमदाबादमथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना आज हिराबेन यांचं निधन झालं. विविध पक्षातील प्रमुख नेत्यांकडून हिराबेन यांना श्राद्धांजली अर्पन करण्यात आली आहे. आईची शिकवण आईकडून आपल्याला मिळालेली शिकवण आणि त्यातून आपन कसे घडत गेलो याचा उल्लेख मोदी अनेकदा आपल्या भाषणात करतात. याच वर्षी जेव्हा हिराबेन यांनी 99 वर्ष पूर्ण करून शंभराव्या वर्षात प्रवेश केला होता. तेव्हा मोदींनी एक ब्लॉग लिहीला होता. या ब्लॉगमध्ये मोदींनी आईची आपल्याला मिळालेली शिकवण, संस्कार आणि त्यातून आपण कसे घडत गेलो याबद्दल सविस्तर लिहीले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भावंडांवर आई हिराबेन यांनी लहानपणापासूनच स्वच्छतेचे संस्कार केले. यातूनच मोदींना स्वच्छ भारत अभियानाची प्रेरणा मिळाली. केंद्रात सत्तेत येताच पंतप्रधान मोदींनी 2014 साली स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. ही एक भाजपची महत्त्वकांक्षी योजना आहे. हेही वाचा : PM Narendra Modi Mother : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मातृशोक, आई हिराबेन मोदी यांचं निधन स्वच्छतेची आवड जेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या आईने 99 वर्ष पूर्ण करून 100 व्या वर्षात पदार्पन केलं होतं, तेव्हा पंतप्रधान मोदींनी आपल्या आईबद्दल एक ब्लॉग लिहीला होता. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, स्वच्छतेच्या बाबतीत आई किती जागृक आहे, हे मी आजही पहातो. मी दिल्लीहून जेव्हाही गांधीनगरला माझ्या आईची भेटी घेण्यासाठी जातो, तेव्हा आई तिच्या हाताने मला मिठाई खाऊ घालते. जेव्हा एखादी आई लहान मुलाला काही खाऊ घातल्यानंतर त्याचे तोंड पुसते, तसंच आजही माझी आई मला मिठाई खाऊ घातल्यानंतर माझं तोडं पुसते. माझी आई सतत तिच्याजवळ एक रुमाल किंवा छोटा टॉवेल ठेवते. हेही वाचा : PM Narendra Modi Mother : आईची ‘ती’ भेट आणि सोबत जेवण, PM मोदींनी पाय धुवत घेतले होते आशीर्वाद वडनगरचा किस्सा आईला स्वच्छतेची किती आवड होती हे सांगताना मोदींनी याच ब्लॉगमध्ये वडनगरचा एक किस्सा पण सांगितला होता. वडनगरमध्ये आम्ही ज्या घरात राहात होतो, तिथे घराच्या जवळच एक नाली होती. या नालीची साफसफाई करण्यासाठी जो कोणी कामगार येत असे त्याला चहा पाजल्याशिवाय माझी आई कधीही जाऊ देत नसे, असं मोदींनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.