मुंबई, 30 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. त्या 100 शंभर वर्षांच्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईची तब्येत बिघडली होती, त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 18 जून रोजी आपला 100 वा वाढदिवस साजरा केला. गुजरात निवडणुकीआधी मार्च 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आपल्या घरी जाऊन आईचे आशीर्वाद घेतले होते. हिराबेन यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी म्हटलं.
#BREAKING | Prime Minister Narendra Modi's mother Heeraben Modi passed away at the age of 100. pic.twitter.com/fDAF7KvH7x
— ANI (@ANI) December 30, 2022
शानदार शताब्दीचं देवाच्या चरणी विश्रांती असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, आईमध्ये मला नेहमीच एक त्रिमूर्ती दिसली. ज्यात एका तपस्वीचा प्रवास, निष्काम कर्मयोगीचं प्रतिक आणि मूल्यांबद्दल कटिबद्ध जीवन होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा जन्म 18 जून 1923 रोजी गांधीनगर इथे झाला. गांधीनगर शहराच्या सीमेवरील रेसन गावात हिराबेन पंतप्रधानांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत राहतात. पंतप्रधान झाल्यानंतर कोणत्याही सुरक्षेशिवाय नरेंद्र मोदी आईला भेटण्यासाठी गांधीनगरला 17 सप्टेंबर 2014 रोजी घरी पोहोचले होते. यावेळी त्यांनी आईसोबत काही खास क्षण घालवले होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.