वॉशिंग्टन 25 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी QUAD परिषदेत
(Quad Summit 2021 Updates) भाग घेतला. आपल्या अभिभाषणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
(PM Narendra Modi in Quad) यावर जोर दिला की QUAD देशांना इंडो-पॅसिफिक
(Indo-Pacific) क्षेत्रात एकत्र काम करावे लागेल. त्यांच्या दृष्टीने, QUAD चा उद्देश सर्वांनी मिळून जगात शांतता प्रस्थापित करणे आणि त्याला समृद्धीकडे नेणे हा आहे. पहिल्या फिजिकल क्वाड परिषदेचे ऐतिहासिक वर्णन करत पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे आभार मानले.
न्यायाधीशांसमोर गँगवॉर, Delhi कोर्टातील Shootout चा Live Video
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी QUAD चा उद्देश स्पष्ट करताना सांगितलं की, वर्ष 2004 नंतर प्रथमच QUAD देश एकत्र आले. तेव्हा त्सुनामीला तोंड देण्यासाठी सर्व प्रकारची मदत देण्यात आली होती. आता जेव्हा संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे, तेव्हा जगाच्या भल्यासाठी QUAD सक्रिय झालं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, आमच्या क्वाड लसीचा उपक्रम इंडो-पॅसिफिक देशांना मदत करेल. क्वाडने आपल्या सामायिक लोकशाही मूल्यांवर आधारित सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मला माझ्या मित्रांशी चर्चा करण्यात आनंद होईल - मग ती पुरवठा साखळी, जागतिक सुरक्षा, हवामान कृती, कोविड प्रतिसाद किंवा तांत्रिक सहकार्यावर असो.
पंतप्रधान मोदी म्हणाले, जग कोविड साथीचा सामना करत आहे, म्हणून आपण पुन्हा एकदा मानवतेच्या हितासाठी क्वाडच्या स्वरूपात एकत्र काम करत आहोत. आपलं क्वाड जागतिक हितासाठी एक प्रकारची शक्ती म्हणून काम करेल. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन म्हणाले, "जागतिक पुरवठा वाढवण्यासाठी भारतात लसीचे अतिरिक्त 1 अब्ज डोस तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे."
Shootout At दिल्ली कोर्ट; गँगस्टर गोगी ठार, तीन जणांचा मृत्यू, Watch Video
आधी असं सांगितलं जात होतं, की ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिकेचे नेते अंतराळ, पुरवठा साखळी उपक्रम आणि 5G विस्तार उपक्रमांवर नवीन कार्यसमूह जाहीर करतील. व्हाईट हाऊसने सांगितलं की, शुक्रवारी येथे त्यांच्या ऐतिहासिक बैठकीदरम्यान, ते हिंद प्रशांत क्षेत्रातील आव्हाने, हवामान बदल आणि कोरोना जागतिक महामारीसारख्या मुद्द्यांवर देखील चर्चा करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.