नवी दिल्ली, 24 सप्टेंबर: आज राजधानी दिल्ली (Delhi) हादरली आहे. रोहिणी ( Rohini court) कोर्टात आज गँगवॉर पाहायला मिळाला आहे. या गोळीबारात गँगस्टर गोगी (Gangster Gogi) ठार झाला आहे. या गोळीबाराचा आता Live Video समोर आला आहे. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन हल्लेखोरांचाही समावेश आहे. शुक्रवारी दुपारी कोर्टात मोस्ट वॉन्टेड गँगस्टर जितेंद्र ऊरफ गोगी याची गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. ज्यानंतर कोर्टात गोळीबार झाला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना ठार केलं आहे. गोगी तिहार जेलमध्ये होता, शुक्रवारी त्याला सुनावणीसाठी कोर्टात आणण्यात आलं होतं. याच दरम्यान रोहिणी कोर्टात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. धक्कादायक म्हणजे न्यायाधीशांसमोर हा गोळीबार झाला आहे.
वकिल बनून आले होते हल्लेखोर दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर वकिल बनून कोर्टात आले होते. ज्यांनी गँगस्टर गोगीवर गोळीबार केला. स्पेशल सेलची टीम गोगीला कोर्ट रुममध्ये घेऊन गेली होती. जिथे ही घटना घडली आहे. आसाम धुमसलं, पोलिसांचा ग्रामस्थांवर गोळीबार; दोन जणांचा मृत्यू असं म्हटलं जात आहे की, दिल्लीच्या टिल्लू गँगनं गोगीची हत्या केली आहे. जे दोन हल्लेखोर ठार झाले आहे. त्यापैकी एकाच नाव राहुल असून त्याच्यावर 50 हजारांचं बक्षीस आहे. तर दुसऱ्याचं नाव मौरिश आहे. IND w vs AUS W : स्मृती मंधाना फॉर्मात परतली, ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली दमदार खेळी दोन वर्षांपूर्वी गोगीला झाली होती अटक गोगीला दोन वर्षांपूर्वी स्पेशल सेलनं गुरुग्रामहून अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं दिलेल्या माहितीनुसार, गोगीनं गुन्ह्याद्वारे भरपूर संपत्ती कमावली होती. गोगीच्या नेटवर्कमध्ये 50 हून अधिक लोक आहेत.