Home /News /national /

यूपी, गोवा, उत्तराखंडमध्ये सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वपूर्ण बैठक; अमित शहा, राजनाथ सिंहही उपस्थित

यूपी, गोवा, उत्तराखंडमध्ये सरकार स्थापनेबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वपूर्ण बैठक; अमित शहा, राजनाथ सिंहही उपस्थित

योगी आदित्यनाथ 25 मार्चला दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, त्यांच्या मंत्रीमंडळात कोणाचा समावेश होणार याबाबत कोणतीही बातमी आलेली नाही. भाजप आता मंत्रीमंडळ आणि मंत्रीमंडळाच्या यादीत शेवटच्या क्षणी बदल करण्याच्या प्रक्रियेत आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 20 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी नवी दिल्लीतील लोककल्याण मार्गावरील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी उत्तर प्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमधील सरकार स्थापनेबाबत बैठक घेतली. बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष (B L Santosh), राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) हेही उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) 25 मार्च रोजी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, त्यांच्या मंत्रीमंडळात कोणाचा समावेश होणार याबाबत कोणतीही बातमी आलेली नाही. भाजप आता मंत्रीमंडळ आणि मंत्रीमंडळाच्या यादीत शेवटच्या क्षणी बदल करण्याच्या प्रक्रियेत आहे. योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार उत्तर प्रदेशच्या नवनिर्वाचित भाजप सरकारचा शपथविधी सोहळा 25 मार्च रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. याआधी, कदाचित 21 मार्च रोजी काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली जाईल. योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. योगींच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवला आहे. हे वाचा - जम्मू-काश्मीरमध्ये जे काही घडलं त्याला पाकिस्तान-प्रेरित दहशतवाद जबाबदार - आझाद दरम्यान, गोव्यात नवीन सरकार स्थापनेबाबत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांचे पक्षाचे सहकारी विश्वजित राणे यांनी शनिवारी संध्याकाळी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी सावंत आणि राणे हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. राणे यांनी नुकतीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या वृत्ताला भाजपच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे. 21 मार्च रोजी गोव्यात विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक सोमवारी गोव्यात होणार आहे, त्यानंतर पक्षाचे नेते राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतील आणि पुढील सरकार स्थापनेचा दावा करतील. अलीकडेच राज्यातील 40 पैकी 20 विधानसभा जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. भाजपला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (एमजीपी) दोन आणि तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. हे वाचा -पुढील 5 वर्षांत जपान भारतात 42 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार : पंतप्रधानांची माहिती उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपद कोणाकडे? उत्तराखंडमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं आहे. मात्र, येथील मुख्यमंत्री धामी यांना खटिमा येथून हार स्वीकारावी लागली आहे. तरीही त्यांचंच नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर असल्याचं मानलं जात आहे. मात्र, चौबट्टाखालचे आमदार सतपाल महाराज, श्रीनगरचे धन सिंह रावत आणि राज्यसभा सदस्य अनिल बलूनी अशी काही इतरही नावं दावेदारांमध्ये आहेत, असं सूत्रांचं म्हणणं आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Amit Shah, Pm modi, Yogi Aadityanath

    पुढील बातम्या