Home /News /national /

पुढील 5 वर्षांत जपान भारतात 42 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार : द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी दिली माहिती

पुढील 5 वर्षांत जपान भारतात 42 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार : द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी दिली माहिती

जपानच्या 5 ट्रिलियन येन किंवा 42 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा अंदाज लावला तर ती किंमत भारतीय रुपयानुसार 3.2 लाख कोटी रुपये होते. यापूर्वी 2014 मध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अॅबे भारतात आले होते, तेव्हा त्यांनी पाच वर्षांत 3.5 ट्रिलियन येन गुंतवणूक आणि मदत जाहीर केली होती.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 19 मार्च : जपान येत्या पाच वर्षात भारतात 42 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japanese Prime Minister Fumio Kishida) यांच्यासमवेत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. भारत आणि जपान (India Japan Relations) यांच्यात दरवर्षी ही शिखर परिषद आयोजित केली जाते. दोन्ही देशांमध्ये एकूण सहा करार झाले आहेत. भारत आणि जपान यांच्यातील ही द्विपक्षीय बैठक अशा वेळी झाली आहे, जेव्हा युक्रेन संकटाबाबत जगभरात सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. किशिदा एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह भारतात आले आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर ते पहिल्यांदाच भारतात आले आहेत. किशिदा संध्याकाळी चारच्या सुमारास भारतात पोहोचले. त्यानंतर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये दीर्घ चर्चा झाली. किशिदा यांनी पंतप्रधान मोदींशी दीर्घ संवाद साधला. जपानच्या 5 ट्रिलियन येन किंवा 42 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा अंदाज लावला तर ती किंमत भारतीय रुपयानुसार 3.2 लाख कोटी रुपये होते. यापूर्वी 2014 मध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अॅबे भारतात आले होते, तेव्हा त्यांनी पाच वर्षांत 3.5 ट्रिलियन येन गुंतवणूक आणि मदत जाहीर केली होती. हे वाचा - भगंवत मान यांची टीम तयार, शपथ घेतलेल्या 10 आमदारांचं किती आहे Qualification जपान भारतातील शहरांना पायाभूत सुविधांचा विकास आणि परिवर्तन करण्यास मदत करत आहे. यात हाय स्पीड रेल्वेचाही समावेश आहे, ज्या अंतर्गत मुंबई आणि अहमदाबाददरम्यान बुलेट ट्रेन चालवण्याचा समावेश आहे. यापूर्वी हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान किशिदा यांच्यात चर्चा झाली. दोन्ही देशांनी आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यावर भर दिला. पंतप्रधान कार्यालयानं ही माहिती दिली. हे वाचा - Breaking News: बस पलटली, विद्यार्थ्यांसह आठ जणांचा मृत्यू; 20 जखमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान किशिदा यांच्याशी फोनवर संभाषण केलं होतं. दोन्ही देशांनी धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीवर सहमती दर्शवली आहे. या वर्षी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 70 वर्षे पूर्ण होत आहेत. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान देखील क्वाडच्या माध्यमातून जागतिक स्तरावर भागीदारी करत आहेत.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Japan, Narendra modi, Pm modi

    पुढील बातम्या