श्रीनगर, 20 मार्च : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (congress leader ghulam nabi azad) यांनी जम्मूतील एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या भाषणात महात्मा गांधींना सर्वात मोठे हिंदू म्हटलं. ते म्हणाले, “माझा विश्वास आहे की महात्मा गांधी हे सर्वात मोठे हिंदू आणि धर्मनिरपेक्ष होते.’ काश्मिरी पंडितांच्या (kashmiri pandits) मुद्द्यावर ते म्हणाले की, ‘जम्मू-काश्मीरमध्ये (jammu kashmir) जे काही घडलं त्याला पाकिस्तान आणि दहशतवाद (pakistan and terrorism) जबाबदार आहे.’ हे वाचा - इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात! बंडखोरांनंतर आता बिलावल भुत्तो यांच्याकडून धमकी ..यासाठी मी माझ्या पक्षालाही माफ करत नाही गुलाम नबी आझाद म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्ताननं पेटवून दिलेल्या दहशतवादानं हिंदू, काश्मिरी पंडित, काश्मिरी मुस्लिम, डोग्रा असे सर्वच प्रभावित झाले आहेत आणि सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागलाय. राजकीय पक्ष धर्म, जात आणि इतर गोष्टींच्या आधारे चोवीस तास फूट निर्माण करू शकतात, असं ते म्हणाले. मी कोणत्याही पक्षाला माफ करत नाही, अगदी माझ्या पक्षालाही नाही, हे मोठं विधान त्यांनी केलं.
Correction | I believe that Mahatma* Gandhi was the biggest Hindu and secularist. Pakistan and militancy are responsible for what has happened in J&K, it has affected all Hindus, Kashmiri pandits, Kashmiri Muslims, Dogras: Senior Congress leader Ghulam Nabi Azad in Jammu
— ANI (@ANI) March 20, 2022
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आझाद म्हणाले, ‘नागरी समाजानं एकत्र यावं, एकत्र राहावं. जात, धर्माचा विचार न करता सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे.’ सध्या जम्मू-काश्मीरमध्ये जानेवारी 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या क्रूरतेवर आधारित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्रीच्या चित्रपटाचे देशभरात कौतुक होत आहे. या संदर्भातही गुलाम नबी आझाद बोलत होते.
#WATCH ...Political parties may create a divide 24x7 on basis of religion, caste & other things; I'm not forgiving any party incl mine...Civil society should stay together. Justice must be given to everyone irrespective of caste, religion: Ghulam N Azad, Cong at an event in Jammu pic.twitter.com/2OCo76ny4x
— ANI (@ANI) March 20, 2022
यापूर्वी, 18 मार्चला गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस जी-23 नेत्यांच्या सूचनांबाबत सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या बैठकीसंदर्भात ‘न्यूज 18 इंडिया’शी केलेल्या विशेष संवादात गुलाम नबी आझाद म्हणाले होते की, सोनिया गांधी जी-23 च्या काँग्रेस संघटनेत बदल करण्याच्या सूचनेवर विचार करत आहेत. त्या आवश्यक बदलांसाठी तयार आहे. त्याचवेळी आझाद यांनी जी-23 नेत्यांचं उद्दिष्ट काँग्रेसला फोडणं हा अजिबात नसून काँग्रेसमध्ये राहून संघटना बळकट करणं हे आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.