जाहिरात
मराठी बातम्या / देश / पुजाऱ्यांच्या मदतीला धावून आले ओवैसी, Corona लागण झाल्यानंतर कठीण प्रसंगी केलं मोठं साहाय्य

पुजाऱ्यांच्या मदतीला धावून आले ओवैसी, Corona लागण झाल्यानंतर कठीण प्रसंगी केलं मोठं साहाय्य

पुजाऱ्यांच्या मदतीला धावून आले ओवैसी, Corona लागण झाल्यानंतर कठीण प्रसंगी केलं मोठं साहाय्य

प्रसिद्ध लाल दरवाजा मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांना (Lal Darwaja Temple Head Priest Tested Corona Positive) कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती, मात्र त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नव्हता.

  • -MIN READ
  • Last Updated :

हैदराबाद, 23 एप्रिल: कोरोना दुसर्‍या लाटेमध्ये (Second Wave of Coronavirus) तेलंगणामध्ये देखील परिस्थिती बिकट आहे. हजारो नवीन प्रकरणं रोज नोंदवली जात आहेत. हॉस्पिटलमधील बेड्स ओसंडून वाहत आहेत. ऑक्सिजन उपलब्ध नाही, रेमडेसिव्हीर नाही अशा समस्या इथे देखील आहेत. अशावेळी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी (Asaduddin owaisi) एका पुजाऱ्याच्या केलेल्या मदतीचं कौतुक होतं आहे. प्रसिद्ध लाल दरवाजा मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांना (Lal Darwaja Temple Head Priest Tested Corona Positive) कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती, मात्र त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नव्हता. हैदराबादमधील प्रसिद्ध मंदिराचे हे पुजारी आहेत. या अटीतटीच्या प्रसंगी त्यांच्या मदतीला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींधावून आले आहेत. वयोरुद्ध असणाऱ्या हे मुख्य पुजारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना या संक्रमणाचा अधिकच त्रास जाणवू लागला होता. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी औवेसी त्यांच्या मदतीला धावून आहेत. ओवैसींशी त्यांनी संपर्क केल्यानंतर ओवैसींनी त्वरित त्यांना प्रतिसाद दिला आणि त्यांना आसरा रुग्णालयात भरती करण्यात आलं. (हे वाचा- वर्ध्यात 7 दिवसांत मृतांची संख्या 90, प्रत्यक्षात मात्र 200 जणांवर अंत्यसंस्कार ) श्वास घेण्यात त्रास होत असल्याने घरातील लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण कुठेच बेड्स उपबल्ध नव्हते. शेवटी त्यांनी ही समस्या एमआयएमच्या स्थानिक नेत्यापुढे मांडली. त्यांच्याच पुढाकाराने त्यांनी आपली समस्या खासदार असदुद्दीन ओवैसी यांना सांगितली. अखेर शालिबांडा येथील रुग्णालयात पुजाऱ्यांना बेड उपलब्ध करून देण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुजार्‍यांच्या कुटूंबीयांनी देखील खासदार असदुद्दीन  ओवैसी यांचे कठीण काळात मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत. (हे वाचा- ड्रोनने होणार COVID-19 वॅक्सिनची डिलीव्हरी; असा आहे सरकारचा प्लॅन ) भारतात कोरोनाची परिस्थीती हाताबाहेर जाऊ लागली आहे. आज देशात नव्याने तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. दररोज कोरोना रुग्णांची संख्या नव्या रेकॉर्ड रचत आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोना विषाणूच्या आकडेवारीनं (Corona cases in India) विक्रमी झेप नोंदली आहे. गुरुवारी देशात 3.3 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज (शुक्रवारी) सलग दुसऱ्यांदा कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाखांपार गेला आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढताना दिसत आहे. त्यामुळे काही राज्यात कोरोना लॉकडाऊन (Corona Lockdown) जाहीर करण्यात आलं आहे. तर काही राज्य कोरोना लॉकडाऊन लागू करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण देशाला घरात बंद होण्याची वेळ येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात