मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सरकारी आकडे खोटे? वर्ध्यात 7 दिवसांत मृतांची संख्या 90, प्रत्यक्षात मात्र 200 रुग्णांवर अंत्यसंस्कार

सरकारी आकडे खोटे? वर्ध्यात 7 दिवसांत मृतांची संख्या 90, प्रत्यक्षात मात्र 200 रुग्णांवर अंत्यसंस्कार

Corona Death in Wardha: महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात मागील सात दिवसांत कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीत मोठी तफावत (deference in corona death figures) आढळली आहे

Corona Death in Wardha: महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात मागील सात दिवसांत कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीत मोठी तफावत (deference in corona death figures) आढळली आहे

Corona Death in Wardha: महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात मागील सात दिवसांत कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीत मोठी तफावत (deference in corona death figures) आढळली आहे

  • Published by:  News18 Desk

नरेंद्र मते, वर्धा, 23 एप्रिल: सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येसोबतच मृतांच्या (Corona death) आकडेवारीतही मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे. असं असताना सरकारी आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक तपशील समोर आली आहे. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात मागील सात दिवसांत कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीत मोठी तफावत (deference in corona death figures) आढळली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मागील सात दिवसांत वर्ध्यात एकूण 90 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर प्रत्यक्षात मात्र हा आकडा मोठा असून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केलेल्या रुग्णांची संख्या 200 एवढी आहे.

मागील काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होतं आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मागील चोवीस तासांत वर्ध्यात एकूण 41 जणांचा मृत्यू झाला आहे. असं असलं तरी शासकीय आकडेवारी आणि स्मशानभूमीतील आकडेवारीत मोठी तफावत आढळत आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात 41 रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा वर्षभरातील सर्वात मोठा आहे. मागील सात दिवसांत जिल्ह्यात स्मशानभूमीतील आकडेवारी नुसार 200 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सरकारी आकडेवारी नुसार केवळ 90 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

(हे वाचा-Coronavirus: कोरोनाची आकडेवारी भयंकर, या देशांनी भारतातील प्रवास केला BAN)

वर्ध्याच्या स्मशानभूमीत दररोज असंख्य कोव्हिड रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी याठिकाणी नोंद करण्यात येते. त्यामुळे स्मशानभूमीतील आकडेवारीत आणि आरोग्य विभागाकाकडून दिलेल्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचं दिसलं आहे. शिवाय ही तफावत प्रशासनाला मान्य देखील आहे.

16 एप्रिल 2021 - शासकीय आकडेवारी मृत्यू  : 05 , स्मशानभूमीतील आकडेवारीनुसार मृत्यू : 30

17 एप्रिल 2021- शासकीय आकडेवारी मृत्यू  : 13, स्मशानभूमीतील आकडेवारीनुसार मृत्यू : 20

18 एप्रिल 2021- शासकीय आकडेवारी मृत्यू  : 13, स्मशानभूमीतील आकडेवारीनुसार मृत्यू : 27

19 एप्रिल 2021- शासकीय आकडेवारी मृत्यू  : 11, स्मशानभूमीतील आकडेवारीनुसार मृत्यू : 26

20 एप्रिल 2021- शासकीय आकडेवारी मृत्यू  : 12, स्मशानभूमीतील आकडेवारीनुसार मृत्यू : 27

21 एप्रिल 2021- शासकीय आकडेवारी मृत्यू  : 20, स्मशानभूमीतील आकडेवारीनुसार मृत्यू : 29

22 एप्रिल 2021-शासकीय आकडेवारी मृत्यू  : 16, स्मशानभूमीतील आकडेवारीनुसार मृत्यू : 41

(हे वाचा-Virar Fire: 'माझी बरी होत आलेली आई गेली हो...', मुलीचा मन हेलावून टाकणारा VIDEO)

वरील आकडेवारीनुसार, मागील सात दिवसात शासकीय आकडेवारीनुसार एकूण 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर स्मशानभूमीतील आकडेवारीनुसार 200 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे मागील सात दिवसातील आकडेवारीमध्ये 110 रुग्णांची तफावत आढळली आहे. त्यामुळे सरकारी आकडेवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे. ही तफावत आढळण्यामागे नेमकी काय कारणं आहेत, याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया संबंधित प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

First published:

Tags: Corona patient, Coronavirus cases, Death, Wardha news