ड्रोनने होणार COVID-19 वॅक्सिनची डिलीव्हरी; असा आहे सरकारचा प्लॅन

ड्रोनने होणार COVID-19 वॅक्सिनची डिलीव्हरी; असा आहे सरकारचा प्लॅन

येणाऱ्या काही दिवसात देशात ड्रोनद्वारे गरजूंना कोविड वॅक्सिन पोहचलं जाण्याची शक्यता आहे. Ministry of Civil Aviation ने ही परवानगी सशर्त दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 एप्रिल : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. अशात कोरोनाविरोधात वॅक्सिनेशनचा वेग वाढवण्यासाठी Ministry of Civil Aviation आणि नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून (DGCA) आयआयटी कानपूरच्या सहयोगाने ड्रोनद्वारे कोविड-19 वॅक्सिनच्या डिस्ट्रिब्यूशनसाठी ICMR ला अभ्यास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

येणाऱ्या काही दिवसात देशात ड्रोनद्वारे गरजूंना कोविड वॅक्सिन पोहचलं जाण्याची शक्यता आहे. Ministry of Civil Aviation ने ही परवानगी सशर्त दिली आहे.

देहरादून, हरिद्वार आणि रुद्रपूर येथे सशर्त ड्रोनच्या वापरासाठी सूट मिळाली आहे. यासाठी GIS आधारित डेटाबेस आणि इलेक्ट्रॉनिक टॅक्स रिसीप्टचा डेटा तयार केला जात आहे. तसंच वेदांत लिमिटेटलाही ड्रोनद्वारे मॅप आणि डेटा एकत्र करण्यासाठी सशर्त मंजूरी मिळाली आहे.

(वाचा - टाटा ऑक्सिजन देऊ शकतात तर इतर का नाही? Oxygen पुरवठ्यावरुन HCने केंद्राला फटकारल)

भारतात (India) वाढणाऱ्या कोरोना व्हायरस प्रकरणांबाबत चीनने प्रतिक्रिया दिली आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारताशी बातचीत करण्यास तयार असल्याचं चीनने (China) म्हटलं आहे. भारतात गुरुवारी रेकॉर्ड ब्रेक कोरोना रुग्णांची वाढ झाली. गुरुवारी 3 लाख 14 हजार 835 नवे कोरोनाग्रस्त आढळले. हा जगभरातील एका दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे.

(वाचा - कोरोना विस्फोट: देशभरात ऑक्सिजनची कमी; नेमका कसा तयार केला जातो मेडिकल Oxygen)

देशात 4 एप्रिलला कोरोनाचे जवळपास 1 लाख रुग्ण समोर आले होते. यानंतर बरोबर सतरा दिवसांनी म्हणजेच बुधवारी 3 लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान कोरोना रुग्णसंख्येत दररोज 6.76 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेपेक्षा भारतात हा विषाणू चार पटीनं झपाट्यानं पसरत आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: April 23, 2021, 1:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या