नवी दिल्ली, 19 मार्च : निर्भया प्रकरणातील चारही दोषींना उद्या (20 मार्च) फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पतियाळा कोर्टाने दोषींच्या सर्व याचिका फेटाळत फाशीला स्थगिती देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पण तरीही दोषींचे वकिलाचा शेवटच्या क्षणापर्यंत फाशी टाळण्याचा खटाटोप सुरू आहे.
निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी वारंवार याचिका करून तारीख पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचे सगळे मनसुबे अपयशी ठरले आहेत. फाशीला स्थगिती मिळवण्यासाठी दोषींच्या वकिलाने कुठलेही युक्तिवाद केले. 'त्यांना फाशी द्यायच्या ऐवजी जन्मठेप द्या. त्यांना पाकिस्तान बॉर्डरवर पाठवा किंवा डोकलामला पाठवा. ते देशाची सेवा करायला तयार आहेत. मी तसं लिहून देतो', असं दोषींचे वकील ए. पी. सिंग कोर्टापुढे म्हणाले.
फाशी देऊन बलात्काराच्या घटना थांबणार आहेत का, असाही युक्तिवाद सिंग यांनी केला. पण कोर्टाने त्यांचे सगळे युक्तिवाद फेटाळून लावत फाशीच्या तारखेवर शिक्कमोर्तब केलं.
AP Singh, 2012 Delhi gangrape case convicts lawyer before Patiala House Court: Send them to Indo-Pak border, send them to Doklam, but don't hang them. They are ready to serve the country. I can file an affidavit in this regard. (file pic) pic.twitter.com/6FMSxcpn9e
— ANI (@ANI) March 19, 2020
आपल्या देशाच्या घटनेनुसार आणि कायद्यानुसार दुर्मिळातल्या दुर्मिळ आणि असामान्य गुन्ह्यासाठीच केवळ मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. फाशी देण्यासाठी बरेच नियम आणि प्रथा पाळल्या जातात. फाशीची तयारी कारागृह प्रशासन बराच काळ आधीपासून करत असते. मानवतेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारांना मृत्यूच्या वेळी कमीत कमी शारीरिक वेदना व्हाव्यात यासाठीही तयारी केली जाते. अशा अनेक प्रथांपैकीच एक म्हणजे फाशीची वेळ शक्यतो अंधारातली असते. सूर्योदयापूर्वी फाशी देण्याची पद्धत आहे. तसा नियम आहे. फाशीची तारीख 20 मार्च ठरल्यानंतर सकाळी 6 वाजता फाशी दिली जाईल, असं जाहीर करण्यात आलं. पण लगेचच ही वेळ बदलल्याची बातमी आली. 6 ऐवजी सकाळी 5.30 वाजता फाशी देण्यात येणार आहे. दिल्लीला त्या दिवशीच्या सूर्योदयाची वेळ पाहता फाशीच्या अंमलबजावणीची वेळही बदलण्यात आली असावी, अशी चर्चा आहे.
आतापर्यंत नेमकं काय झालं?
संपूर्ण देश हादरवणाऱ्या निर्भया गँगरेप केसमधील (Nirbhaya Gang Rape Case) दोषींना अखेर 20 मार्चला सकाळी 5.30 ला फाशी देण्याचं ठरलं आहे. कोर्टाने चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केलं आहे. याआधी तीन वेळा फाशीची तारीख आणि वेळ निश्चित झाल्यानंतर दोषींपैकी कुणी ना कुणी कोर्टाची दारं ठोठावत राहिल्यामुळे डेथ वॉरंट रद्द झालं होतं.
संबंधित - 'ती माझी मुलगी असती तर मी तिला जिवंत जाळलं असतं',निर्भया प्रकरणी वकिलांचं विधान
तीन वेळा रद्द झाल्यानंतर आता चौथ्या वेळी कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे. यावेळी दोषींची फाशी अटळ असल्याचं बोललं जात आहे.
याचिकांवर याचिका, तारीख पे तारीख
निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना एकत्रितपणे 20 मार्च रोजी सकाळी फाशी देण्यात येईल. यापूर्वी 3 मार्च फाशीची तारीख ठरली होती. पण एक दोषी पवनकुमार गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका दाखल केल्याने सुनावणी सुरू झाली आणि फाशी रद्द झाली.
संबंधित - Nirbhaya Gangrape: फाशी देताना दोर तुटला तर... काय आहे नियम?
पवनची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींनीही त्याची दया याचिका फेटाळली आहे. पवन कुमारने आतापर्यंत सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला असून आता त्यांची फाशी अटळ असल्याचे सांगितलं जात आहे.
पवनने गुन्हा केला तेव्हा तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यापार्श्वभूमीवर त्याच्या फाशीच्या शिक्षेत बदल करुन जन्मठेप द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. दुसरा दोषी अक्षय यानेसुद्धा नव्याने दया याचिका दाखल केली होती. पण त्याचीही याचिका फेटाळण्यात आली आहे.
अन्य बातम्या
निर्भयाच्या दोषींकडे फक्त काही तास शिल्लक, वाचा सुप्रीम कोर्टानं दिलेला महत्त्वपूर्ण निर्णय
काँग्रेसची उद्या परीक्षा! सुप्रीम कोर्टाचा उद्याच बहुमत चाचणी घ्यायचा निर्णय