नवी दिल्ली, 19 मार्च : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी पवन गुप्ताला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दणका मिळाला आहे. दोषी पवनने केलेली क्युरेटिव्ह याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. याआधी दोषी पवन गुप्ताने कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. निर्भाया प्रकरणात दोषी पवन घटनेदरम्यान अलपवयीन असल्याचा दावा केला होता. मात्र सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळून लावली आहे. फाशी पुढे जाण्यासाठी निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी वारंवार याचिका करून तारीख पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचे सगळे मनसूबे अपयशी ठरले आहेत. निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार दोषींना शनिवारी सकाळी म्हणजे २० मार्चला सकाळी 5.30 वाजता फाशी देण्यात येणार आहे. निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना याआधी 3 मार्च फाशीची तारीख ठरली होती.पवन कुमारने आतापर्यंत सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला असून आता त्यांची फाशी अटळ असल्याचे सांगितलं जात आहे. आता सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर दोषींकडे फक्त काही तासांचा अवधी उरला आहे. पवनने गुन्हा केला तेव्हा तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यापार्श्वभूमीवर त्याच्या फाशीच्या शिक्षेत बदल करुन जन्मठेप द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. दुसरा दोषी अक्षय यानेसुद्धा नव्याने दया याचिका दाखल केली होती. पण त्याचीही याचिका फेटाळण्यात आली आहे.
Supreme Court dismisses the curative petition of one of the convicts in the 2012 Delhi gang-rape and murder case, Pawan Gupta, against the dismissal of his review plea rejecting his juvenility claim. pic.twitter.com/hSvHh4Hg8y
— ANI (@ANI) March 19, 2020
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: Court gave them so many opportunities that they have become habituated of bringing something ahead of hanging&get it postponed. Now, our Courts are aware of their tactics. Nirbhaya will get justice tomorrow. https://t.co/NzSVKZFs1f pic.twitter.com/6YiG53wj8v
— ANI (@ANI) March 19, 2020
काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण? - सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता. - सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. - त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला. - यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले. - तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं. - दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. - मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.