Nirbhaya Gangrape: फाशी देताना दोर तुटला तर... काय आहे नियम?

Nirbhaya Gangrape: फाशी देताना दोर तुटला तर... काय आहे नियम?

देशभर गाजलेल्या दिल्लीतील निर्भया गँगरेप (Nirbhaya Gangrape Case) प्रकरणातील 4 दोषींना शेवटी 20 मार्चला सकाळी 5.30 वाजता तिहार जेलमध्ये फाशी देण्याचं निश्चित झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मार्च: देशभर गाजलेल्या दिल्लीतील निर्भया गँगरेप (Nirbhaya Gangrape Case) प्रकरणातील 4 दोषींना शेवटी 20 मार्चला सकाळी 5.30 वाजता तिहार जेलमध्ये फाशी देण्याचं निश्चित झालं आहे.  पटियाला हाऊस कोर्ट निर्भयाच्या चार दोषींच्या शिक्षेची तारीख जाहीर केली आहे. दोषींचे वकील ए. पी. सिंग शेवटच्या क्षणापर्यंत कोर्टाचे दरवाजे ठोठावत आहेत आणि ही फाशी पुन्हा एकदा रद्द करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण उद्याच्या फाशीसाठी तिहार जेलमध्ये पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

फाशीची संपूर्ण जबाबदारी ही जल्लादाची असते. मात्र तुरुंगाच्या नियमानुसार फाशी देताना फास जर तुटला तर दोषीची शिक्षा माफ होते का? याबाबत तिहार जेलमधील फाशीची अंमलबाजवणी करणाऱ्या पवन जल्लादने खुलासा केला आहे. "जेव्हा एखाद्या दोषीची फाशीच्या शिक्षा देण्याचं ठरत तेव्हा संपूर्ण खबरदारी घेतली जात असते. देशात आजपर्यंत तरी फाशी देताना दोरखंड तुटल्यामुळे कुणाचीही शिक्षा रद्द झाल्याची घटना घडली नाही. फाशीची अंमलबजावणीही पूर्णपणे बजावली गेली आहे", असं पवन यांनी सांगितलं.

फाशीच्या एक दिवस आधी काय होते?

जेव्हा एखाद्या दोषीची फाशी देण्याची तारीख निश्चित केली जाते तेव्हा एक दिवसाआधी आम्हाला जेलमध्ये बोलवण्यात येतं. त्यानंतर त्या आरोपीला फाशी देण्यासाठी प्रक्रिया सुरू होते. फाशी देण्यासाठी काय दोर कोणता वापरायचा? फास कसा बांधायचा? ज्या दिवशी एका दोषीला फाशी द्यायची असते त्या रात्री आम्हाला झोप येत नाही, असं पवन यांनी सांगितलं.

वाचा - भारत सरकारचा मोठा निर्णय! जगासाठी देशाचे दरवाजे बंद

जेव्हा दोषीला फाशी द्याची वेळ ठरलेली असते त्याआधी 15 मिनिटांपूर्वी आम्ही फाशीच्या देण्याच्या ठिकाणी पोहोचतो. त्यानंतर दोषीला फासावर लटकावले जाते. कैद्याला जेव्हा जेलमधून आणले जात असते तेव्हा त्याच्या हातात बेड्या असतात किंवा दोरीने हात बांधलेले असतात. दोन पोलीस कर्मचारी त्याला घेऊन येत असतात. जेलपासून ते फाशी देण्याच्या ठिकाणापर्यंत हा वेळ 15 मिनिटांचा असतो.

पोलिसांसाठीही असतात काही नियम

फाशी देत असताना त्या ठिकाणी 4 ते 5 पोलीस कर्मचारी हजर असतात. ते काहीच बोलत नाही, फक्त एकमेकांना इशारे देत असतात. जर कुणी काही बोललं तर दोषी हा भावनाविवश होऊन जातो आणि नको ती मागणी करू लागतो. त्यामुळे त्यावेळी कुणीही बोलत नाही. त्याशिवाय या ठिकाणी जेल अधिक्षक, उपअधीक्षक आणि डॉक्टरांची टीम हजर असते. मुख्य म्हणजे जल्लाद पवन कुमारच्या परिवाराने आतापर्यंत 25 जणांना फासावर लटकावलं आहे. विशेष म्हणजे, निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्याचं निश्चित झालं तेव्हा तिहार जेलच्या प्रशासनाने जल्लाद निवडीसाठी उत्तर प्रदेश सरकारला पत्र व्यवहार केला होता.

अन्य बातम्या

काँग्रेसची उद्या परीक्षा! सुप्रीम कोर्टाचा उद्याच बहुमत चाचणी घ्यायचा निर्णय

बँकेतील काम लवकरात लवकर उरका, कोरोनामुळे कामकाजाची वेळ घटवण्याची शक्यता

First published: March 19, 2020, 6:57 PM IST

ताज्या बातम्या