लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात 'या' सेवांना मिळाल्या सवलती, मात्र नियम असणार कडक

लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात 'या' सेवांना मिळाल्या सवलती, मात्र नियम असणार कडक

गृह मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये मात्र काही सेवांना सवलती देण्यात आल्या आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्याची घोषणा मंगळवारी (14 एप्रिल) केली. या कालावधीत नियम आणखी कडक केले जाणार असल्याचेही मोदींनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, देशातील काही भागात 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येणार असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गृह मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये मात्र काही सेवांना सवलती देण्यात आल्या आहे. या सेवांना सवलती देण्यात आल्या असल्या तरी नियम मात्र कडक असणार आहेत.

गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये शेती आणि ग्रामीण भागांतील विशिष्ट उद्योगांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. तर, हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, मेट्रो, शाळा, मॉल्स, जलतरण तलाव, जीम यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार आहेत. ही नियमावली हॉटस्पॉट किंवा सील झालेल्या भागांमध्ये लागू होणार नाही.

वाचा-लॉकडाऊनसाठी नवी नियमावली जाहीर; 'या' सेवांना दिल्या सवलती, तर ट्रेन बंदच राहणार

कृषी कामं सुरू राहतील

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना सवलती देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार या नियमावलीमध्ये शेती, शेतकरी संबंधित सर्व उपक्रम तसेच, शेतकऱ्यांना काम करण्याची परवानगी दिली जाणार आहे. कृषी उपकरणांची दुकाने, त्यांची दुरुस्ती व सुटे भागांची दुकाने खुली राहतील. खते, बियाणे, कीटकनाशके तयार करणे व त्यांचे वितरण करण्याचे काम चालूच राहतील, त्यांची दुकाने खुली असतील. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात शेतीसंबंधित साहित्याची देवाणघेवाण केली जाऊ शकते.

वाचा-सर्व दावे कोरोनापुढे फेल, उष्ण प्रदेशांमध्ये अधिक वेगाने वाढतोय प्रादुर्भाव

कामगारांना मिळणार सवलती

वेतनावर काम करणआऱ्या कामगारांच्या पोटापाण्याचा विचार करता काही ठराविक औद्यागिक केवा सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी पुरेसे सेफगार्ड्स आणि अनिवार्य ऑपरेटिंग प्रोटोकॉल (SOPs) यांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर, देशात कोव्हिड-19चा प्रसार होत असताना त्यासाठी आवश्यकतेनुसार व्यवस्थापन करमे गरजेचे आहे. असे न केल्यास व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी नमूद केल्याप्रमाणे दंड व दंडात्मक कारवाईद्वारे केली जाईल. तसेच, वस्तूंच्या वाहतुकीस आवश्यक असल्यास परवानगी दिली जाईल.

वाचा-नगरमधील अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, जिल्हाबंदीच्या आदेशावरून आरोप

ग्रामीण भागातील उद्योगांना सवलती

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, अन्न प्रक्रिया उद्योगांसह ग्रामीण भागात कार्यरत उद्योग; ग्रामीण भागात रस्ते, सिंचन प्रकल्प, इमारती आणि औद्योगिक प्रकल्पांचे बांधकाम; सिंचन व जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन मनरेगा अंतर्गत कामे सुरू राहणार आहेत. ग्रामीण सामान्य सेवा केंद्रे (सीएससी) च्या संचालनास परवानगी आहे. या उपक्रमांमुळे स्थलांतरित कामगार दलासह ग्रामीण कामगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

वाचा-एक घटना आणि उद्धव ठाकरेंवर भाजपच्या 5 नेत्यांनी केला घणाघाती शाब्दिक हल्ला

बॅंकसेवा सुरू राहणार

लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याप्रमाणे बॅंकसेवा सुरू राहणार आहे. लोकांना पैशांची चणचण जाणवू नये यासाठी ATMही 24 तास सुरू राहतील. बॅंका सुरू असल्या तरी, कामकाजाच्या वेळेत कपात करण्यात आली आहे.

First published: April 15, 2020, 10:52 AM IST

ताज्या बातम्या